दिवसभरात कोरोनाचे १०३९ नवे रु ग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 01:32 AM2020-08-28T01:32:33+5:302020-08-28T01:33:06+5:30

जिल्ह्यातील कोरोनाची रु ग्णसंख्या ३३ हजार ८८ इतकी झाली आहे. गुरुवारी (दि.२६) नव्याने १ हजार ३९ रु ग्ण आढळून आले. सर्वाधिक ८०७ रु ग्ण नाशिक शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात दाखल २१ रु ग्ण कोरोनामुळे दगावले. यामध्ये नाशिक मनपा हद्दीतील ९, ग्रामीणमधील १० आणि मालेगावतील एक व जिल्ह्याबाहेरील १ रु ग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात गुरु वारी ५४७ रु ग्णांनी कोरोनावर मात केली.

During the day, Corona's 1039 new Rs | दिवसभरात कोरोनाचे १०३९ नवे रु ग्ण

दिवसभरात कोरोनाचे १०३९ नवे रु ग्ण

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात एकाच दिवशी २१ जणांचा मृत्यू : ५४७ रु ग्णांनी केली मात

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाची रु ग्णसंख्या ३३ हजार ८८ इतकी झाली आहे. गुरुवारी (दि.२६) नव्याने १ हजार ३९ रु ग्ण आढळून आले. सर्वाधिक ८०७ रु ग्ण नाशिक शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात दाखल २१ रु ग्ण कोरोनामुळे दगावले. यामध्ये नाशिक मनपा हद्दीतील ९, ग्रामीणमधील १० आणि मालेगावतील एक व जिल्ह्याबाहेरील १ रु ग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात गुरु वारी ५४७ रु ग्णांनी कोरोनावर मात केली.
मागील चार दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा घसरला होता; मात्र बुधवारपासून अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी कोरोनाबाधित रु ग्णांचा जिल्ह्याचा आकडा थेट १ हजाराच्या पुढे सरकला. दिवसभरात जिल्ह्यात १ हजार १२३ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
२६ हजार ५९६ रुग्णांचा कोरोनावर विजय
शहरवासीयांकरिता कोरोना संक्र मणाचा धोका अधिकच वाढला आहे. नाशिक ग्रामीणमध्ये २९७, तर मालेगावात ४० संशयित रु ग्ण गुरु वारी दाखल झाले आहेत. नाशिक ग्रामीणच्या तुलनेत
शहरात स्थिती अधिक चिंताजनक होत चालली आहे. जिल्ह्यातील वाढत्या रु ग्णसंख्येसोबत दगावणाऱ्या रु ग्णांचे प्रमाणही वाढले आहे.
सर्वाधिक ७६५ रु ग्ण शहरातील आहेत. गुरु वारी सर्वाधिक २१ रु ग्ण मृत्युमुखी पडले. सध्या जिल्ह्यात आतापर्यंत २६ हजार ५९६ रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तसेच ५ हजार ६५८ रु ग्ण उपचार घेत आहेत. ८८ हजार ८३ संशयितांचे नमुने चाचणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
च्गेल्या काही महिन्यांमध्ये शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे निर्माण झालेले संकट पाहता नागरिकांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. सध्याचा काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्र मणाचा धोका अधिक वाढला आहे.

Web Title: During the day, Corona's 1039 new Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.