दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जगविले शाळेच्या परिसरातील झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 06:09 PM2018-11-22T18:09:57+5:302018-11-22T18:10:44+5:30
मानोरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी म्हटली की त्यांचा आनंद गगनात मावेनासा होत असतो. कधी ...
मानोरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी म्हटली की त्यांचा आनंद गगनात मावेनासा होत असतो. कधी शाळेला सुट्टी लागेल, कधी मामाच्या गावाला जाईल अशी परिस्थिती विद्यार्थ्यांची होत असते. परंतू येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीत सुट्टी तर शिक्षकांनी दिली पण सुट्टी त काय करायचे याची देखील माहिती शिक्षकांनी दिली होती. त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांनी दिलेल्या कामाची दखल घेत दिवाळीला मामा च्या घरी न जाता शाळेतील झाडे जगवण्याची योजना आत्मसात करून गावात एक आदर्श निर्माण केला आहे. ती म्हणजे जून मिहन्यात नवागत विद्यार्थ्यांच्या हस्ते झालेले वृक्षारोपण सांभाळण्याची जबाबदारी येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना दिली होती. शाळेला संरक्षण भिंत नसल्याने हिरवीगार झालेली झाडे जगवायची कशी आण ित्यांना सुट्टी च्या काळात झाडांना पाणी देणार कोण ? आण िमुलांनी मोठ्या आपुलकीने वाढवलेल्या झाडांना पाणी देणार कोण अशा परिस्थितीत नेहमी विविध प्रकारच्या नवीन उपक्र मातून नाविन्यपूर्ण शिक्षण देणार्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अगरचंद शिंदे, शिक्षक राजू सानप यांनी शाळेला सुट्टी लागण्याआधी मुलांना झाडाचे महत्त्व आण िझाडापासून होणारे फायदे याची माहिती दिली होती. या पाशर््वभूमीवर सुट्टी लागल्यापासून मुले नित्यनेमाने दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा शालेय परिसरात येऊन सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीतून बादलीच्या साहाय्याने झाडांना पाणी घालून झाडे हिरवीगार ठेवत आहे.मुलांच्या या उत्कृष्ट कामाबद्दल पालकांनी तसेच ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. झाडांना पाणी घालण्यासाठी निखिल भवर,दुर्गेश भवर,ओम शेळके,अनुष्का भवर,अजिंक्य पवार आदी विद्यार्थी नियमति सुट्टीच्या दिवशी शाळेतील झाडांना पाणी घालतात.
" सध्याच्या काळात झाडांचे आण िपर्यावरणाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.याच परिस्थितीत आमच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना आम्ही झाडांचे महत्त्व , झाडांपासून होणारे फायदे आण िपर्यावरण व्यविस्थत टिकवण्याची माहिती देऊन मुलांना झाडाविषयी प्रेरणा वाढावी यासाठी आम्ही दिवाळीच्या सुट्टीत मुलांना झाडे जगविण्यासाठी नियमतिपणे पाणी घालण्याचे आवाहन केले आण त्यांनी ते यशस्वी देखील करून दाखिवले.
- राजू सानप शिक्षक प्राथमिक शाळा, मानोरी बु.