महाशिवरात्री दिवशीही त्र्यंबकेश्वर देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, अनेक कार्यक्रम रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 09:59 AM2019-03-04T09:59:49+5:302019-03-04T10:02:21+5:30
प्रोटोकॉल वगळता व्हीआयपी दर्शन सेवा बंद. बचत गट पुरोहित संघ व तुंगार ट्रस्टची मदत
बकेश्वर : वेतनवाढीच्या मागणीसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महाशिवरात्रीस होणारे जादाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, देवस्थान ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेगळे नियोजन करावे लागले आहे. सध्या तुंगार मंडळी ट्रस्टचे कर्मचारी, बचत गटांच्या महिला, काही सेवाभावी युवक, पुरोहित संघाचे कार्यकर्ते याशिवाय स्वतः विश्वस्त मंडळाचे सदस्य गर्दीचे नियोजन उभे राहुन करत आहेत.
महाशिवरात्री हा दिवस ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर देवस्थानचा मुख्य दिवस असतो. इतर सणा वारांपेक्षा महाशिवरात्रीला येथे जादा महत्व आहे. महामृत्युंजय भगवान शिवाचे येथे अधिष्ठान आहे. हे ज्योतिर्लिंग स्वयंभु ज्योतिर्लिंग आहे. येथे पिंडीवर शाळुंका ऐवजी अंगठ्याच्या आकाराचे तीन पिंडीतील खळग्यामध्ये ब्रम्हा-विष्णू-महेश यांच्या प्रतिकृती म्हणुन तीन लिंगे आहेत. म्हणुन या ज्योतिर्लिंगाला इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा आगळे वेगळे महत्व आहे. म्हणुनच महाशिवरात्रीस येथे विशेष महत्व आहे.
या दिवशी दर्शन नियोजन पुढील प्रमाणे :
भाविकांना दर्शन घेण्याच्या दृष्टीने मंदीराचे पुर्वेकडील गेटमधुन धर्मदर्शन भाविकांना 24 तास खुले असेल.
देणगी दर्शनाच्या वेळ मंदीर उघडल्यापासून सकाळी 07.00 पासुन मंदीर बंद होईपर्यंत सुरु राहील. तथापि गर्दीनुसार देणगी, दर्शनाबाबत प्रशासन नियोजनाबाबत निर्णय घेईल. स्थानिक भाविकांना पश्चिम दरवाजाने पहाटे मंदीर उघडल्या पासुन दुपारी 12.30 पर्यंत. व सायंकाळी 6.00 वाजेपासुन ते दुसऱ्या दिवशी दि. 5 मार्चपर्यंत दुपारी 12.30 पर्यंत दर्शन घेता येईल. मात्र, ओळखपत्र बरोबर आणणे अनिवार्य आहे. तसेच सायंकाळी 6.00 पासुन मंदीर बंद होईपर्यंत प्रवेश राहील. मात्र मंदीरात जातांना आतील उत्तर दरवाजाने रांगेतुन दर्शन घ्यावे. पुरोहितांनी आपल्या यजमानांच्या धार्मिक विधीसाठी आणतांना पश्चिम (कोठीच्या) गेटने प्रवेश मिळेल. मंदीर उघडल्यापासुन सकाळी 12.30 पर्यत. महाशिवरात्रीनिमित्त भगवान त्र्यंबक राजाची पालखी दुपारी अडीच वाजता काढली जाईल.
स्थानिक भाविक व बाहेरुन आलेले भाविक यांनी मंदीराबाहेर पडतांना दक्षिण दरवाजानेच (गायत्री मंदीराकडील) बाहेर पडावे. दरम्यान, महाशिवरात्री उत्सव सुलभतेने साजरा करणे व आखीव रेखीव पध्दतीने साजरा करण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष न्या.एम एस बोधनकर यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे