त्र्यंबकला सिंहस्थ काळात चारही पीठांचे शंकराचार्य येणार
By admin | Published: February 15, 2015 12:38 AM2015-02-15T00:38:24+5:302015-02-15T00:38:46+5:30
त्र्यंबकला सिंहस्थ काळात चारही पीठांचे शंकराचार्य येणार
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ पर्वकाळात चारही पीठांचे शंकराचार्य त्र्यंबकेश्वरला येणार असून, विशेष म्हणजे या काळात चतुर्मास असल्याने शंकराचार्य या काळात नदी ओलांडत नाहीत. त्यातही या काळात शंकराचार्य गोदावरी ओलांडणार नाही. यास्तव ते जुना आखाड्याच्या जागेत किंवा निरंजनी आखाड्यांच्या जागेत राहतील. तेथे शंकराचार्य नगर असे नामकरण करून त्यांना शासनाने मूळ सुविधा द्यावात, अशी मागणी होत आहे. ज्या आखाड्यांकडे जागा आहेत. त्यापैकी पिंपळद येथे जुन्या आखाड्यांची गुरुगादी आहे तेथे मूलभूत सुविधा आहेत. निरंजनी आखाड्याची अंबोली (बुवाचा पाडा) येथे जागा आहे. त्यांना मूलभूत व दोन्हीही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नळ लावून देण्यात यावेत, तसेच ज्या आखाड्यांना जागाच नाही अशादेखील आहे त्या जागेत मूलभूत सुविधा द्याव्यात. सर्व सुविधांचे पालन शासनाने करावे. सर्व सूचना महंत हरिगिरी, महंत प्रेमगिरी, महंत नरेंद्रगिरी, समुद्रगिरी यांनी मांडल्या. सर्व सूचना (प्रस्ताव) एकमताने मंजूर करण्यात आल्या असून, प्रस्तावाच्या प्रति शासनाकडे पाठवून देण्यात आल्या.
दरम्यान, शंकराचार्य येणार असल्यामुळे आणि त्यांचे वास्तव्य असल्याने त्यांना मूलभूत सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी असून, असे पहिल्यांदाच होत आहे असे आखाडा परिषदेचे मत आहे. (वार्ताहर)