स्थिर सरकारच्या काळात देशाच्या प्रगतीचा वेग चांगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 04:12 PM2018-11-27T16:12:24+5:302018-11-27T16:12:31+5:30

येवला : ज्या काळात देशात शांतता व स्थिर सरकार होती त्या काळात प्रगतीचा वेग चांगला होता पण ज्यावेळी संमिश्र सरकारे आली त्यावेळी आपल्या देशाला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.विनायक गोविलकर यांनी केले.

 During the stable government, the progress of the country is good | स्थिर सरकारच्या काळात देशाच्या प्रगतीचा वेग चांगला

स्थिर सरकारच्या काळात देशाच्या प्रगतीचा वेग चांगला

googlenewsNext
ठळक मुद्दे वि.म. गोविलकर: सेनापती तात्या टोपे व्याख्यानमाला

येवला :
ज्या काळात देशात शांतता व स्थिर सरकार होती त्या काळात प्रगतीचा वेग चांगला होता पण ज्यावेळी संमिश्र सरकारे आली त्यावेळी आपल्या देशाला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.विनायक गोविलकर यांनी केले.
सेनापती तात्या टोपे व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प गुंफतांना कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. दिलीप कुलकर्णी होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार मारोतराव पवार,डॉ.एस.के.पाटील उपस्थित होते.याप्रसंगी नेत्ररोगतज्ञ डॉ.शशिकांत गायकवाड,सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता चंद्रहर्ष आव्हाड याना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. .
डॉ.गोविलकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सन १९४७ते २०१८ या काळात भारताच्या आर्थिक प्रगतीचे विश्लेषण केले.१९४७ ते १९७५,१९७५ ते १९९१, १९९१ ते २००९ , २००९ ते २०१४ व २०१४ ते २०१८ या ५ टप्यात भारताच्या आर्थिक प्रगतीचे वर्णन केले. १९९१ मध्ये विदेशी चलन मिळवण्यासाठी सोने गहाण ठेवावे लागले. १९९१,मध्ये उत्तम प्रशासक म्हणून पंतप्रधान नरिसहराव यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर मनमोहनसिंग यांना अर्थमंत्री केले. त्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती सुरळीत झाली. पण तेच मनमोहनिसंग पंतप्रधान झाल्यानंतर प्रशासनावर पकड न राहिल्याने २००९ -२०१४ या कालखंडात अनेक आर्थिक घोटाळे उजेडात आले. २०१४ मध्ये सत्तांतर होऊन २५ वर्षानंतर देशात स्थिर सरकार आल्याने देशाचा आर्थिक प्रगतीचा मंदावलेला वेग पुन्हा प्रगतीपथावर आला. आता जगातील तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास आला आहे. लवकरच जगातील आर्थिक सत्तेत फेरबदल होऊन भारत पहिल्या क्र मांकावर येईल असे भाकीत त्यांनी केले. प्रास्ताविक साहेबराव सैद यांनी तर आभार धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी किशोर सोनवणे, नगरसेवक प्रवीण बनकर, पुरु षोत्तम रहाणे, एम.पी. गायकवाड, बाळासाहेब रहाणे, अशोक कुळधर. रघुनाथ खैरनार, गोविंद भोरकडे, जयंत पेठकर, श्रीकांत खंदारे, नारायण क्षीरसागर, प्रमोद पाटील, विजय आहेर आदींनी परिश्रम घेतले.

स्थिर सरकारच्या काळात देशाच्या प्रगतीचा वेग चांगला
वि.म. गोविलकर: सेनापती तात्या टोपे व्याख्यानमाला

Web Title:  During the stable government, the progress of the country is good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.