ग्रामीण भागातील दुर्वा, फुलांचा दरवळ वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 09:55 PM2020-08-23T21:55:06+5:302020-08-24T00:19:04+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागात पिकविलेल्या विविध फुले व दुर्वा यांना शहरी भागात मागणी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागात पिकविलेल्या विविध फुले व दुर्वा यांना शहरी भागात मागणी वाढली आहे.
कोरोनाच्या काळात सर्वच धार्मिक उत्सव बंद केल्यामुळे नर्सरीमधील फुले फेकून देण्याची वेळ आली होती. त्यामुळे या काळात अनेक नर्सरी व्यावसायिकांना उपासमारीचा सामना करावा लागला. आज ना उद्या फुलांला दर मिळेल, त्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन जिवाचे रान करून फुलाची शेती वाचवली. त्यासाठी शेतकरीवर्गाने आपल्या पॅलिहाऊसची चांगल्याप्रकारे डागडुजी करून घेतली. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने तसेच काही ठिकाणी धार्मिक विधी व उत्सव थोड्याफार प्रमाणात सुरू झाल्याने फुलांना मागणी वाढली आहे. आता पॅलिहाऊसमधील फुलांना चांगला बहर आला असून मागे झालेले नुकसान भरून निघण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. सध्या ग्रामीण भागात गुलाब, जास्वंदी, झेंडू व इतर काही वेगवेगळ्या फुलांना चांगली बाजारपेठे मिळत आहे.दुर्वाची जुडी
करण्यात मजूर व्यस्तगणेशोत्सव असल्यामुळे दुर्वालासुद्धा मागणी आहे. सध्या एका जुडीला ३० ते ४० रु पये दर मिळत आहे. त्यामुळे गणपती बाप्पा बळीराजाचे अश्रू पुसेल असे चित्र निर्माण झाले आहे. सध्या पावसाळी वातावरणामुळे बांधावर हरळी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा उपयोग दुर्वासाठी केला जातो. त्यामुळे हे गवत कापून त्याच्या दुर्वा बनविण्यासाठी मजूर व्यस्त आहेत.