कडक उन्हामुळे नाशकातील रस्ते ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:28 AM2018-03-13T00:28:56+5:302018-03-13T00:28:56+5:30

शहरात कडक उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, नागरिकांना सकाळपासूनच उकाड्याचा सामना करावा  लागत आहे. दुपारी १२ वाजेनंतर उन्हाच्या झळा अधिकच तीव्र  होत असल्याने पंचवटीतील  मुख्य वाहतूक रस्त्यावर वाहतूक मंदावत असल्याने रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र दिसून येत  आहे.

Dusk roads due to strong winds | कडक उन्हामुळे नाशकातील रस्ते ओस

कडक उन्हामुळे नाशकातील रस्ते ओस

Next

पंचवटी : शहरात कडक उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, नागरिकांना सकाळपासूनच उकाड्याचा सामना करावा  लागत आहे. दुपारी १२ वाजेनंतर उन्हाच्या झळा अधिकच तीव्र  होत असल्याने पंचवटीतील  मुख्य वाहतूक रस्त्यावर वाहतूक मंदावत असल्याने रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र दिसून येत  आहे. एरव्ही दिवसभर वाहनांच्या वर्दळीने फुलणारे रस्ते उन्हामुळे ओस पडत असल्याने मुख्य रस्त्यावर काहीकाळ शुकशुकाट पसरत आहे.  नागरिकही घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करीत आहेत, तर ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याने बाजारपेठेत दुपारच्या वेळी शांतता दिसत आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत कडक हातगाडीधारक, फेरीवालेदेखील झाडाच्या सावलीचा आधार घेत असल्याचे दिसून येते.
उसाच्या रसाला मागणी
उन्हाळ्यात उसाच्या रसाला मागणी असल्याने ठिकठिकाणी रसवंतीच्या गाड्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत तर बसस्थानकाबाहेर रसवंतीगृह तसेच लिंबूपाणी, आइस्क्र ीम विक्रेते, बर्फ गोळा, सरबत विक्र ीची दुकाने थाटण्यास प्रारंभ झाला आहे. कामानिमित्ताने घराबाहेर पडणारे नागरिक विशेषत: ज्येष्ठ नागरिक डोक्यावर छत्री किंवा हॅट परिधान करून उन्हापासून बचाव करत असल्याचे दिसून येत आहे. बाजारात द्राक्षांबरोबरच कलिंगड, खरबुज, आंब्याचेही आगमन झाले आहे.

Web Title: Dusk roads due to strong winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक