दिंडोरी तालुक्यात दसरा उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 03:03 PM2020-10-26T15:03:56+5:302020-10-26T15:04:53+5:30

लखमापूर : साडेतीन मुहूर्तपैकी एक असलेला दसरा पारंपारिकरित्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Dussehra celebrated in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यात दसरा उत्साहात साजरा

दिंडोरी तालुक्यात दसरा उत्साहात साजरा

googlenewsNext
ठळक मुद्देव्यावसायिकांत उत्साह

लखमापूर : साडेतीन मुहूर्तपैकी एक असलेला दसरा पारंपारिकरित्या उत्साहात साजरा करण्यात आला.

एकमेकांना आपट्यांची पाने देऊन नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी नसली तरी व्यवसायाला बऱ्यापैकी चालना मिळाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. कापड, वाहन क्षेत्रातही समाधानकारक व्यवहार झाले. मिठाईच्या दुकानातून मिठाई घेऊन नागरिकांनी दसरा गोड साजरा केला.
विशेष म्हणजे वाहन व्यवसायात कार मॉल या ठिकाणी देखील जुनी वाहने खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती. तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी पेठ, सुरगाणा येथून आपट्यांची पाने विकण्यासाठी नागरिक झाडाखाली बसून व्यवसाय करीत होती.
व्यावसायिकांत उत्साह
गेल्या सहा ते सात महिन्यापासून कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांनी दसरा उत्साहात साजरा केला. लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या व्यवसायाला यामुळे चालना मिळाली. नागरिकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर विविध वस्तूची खरेदी केल्याने व्यावसायिक वर्गाने समाधान व्यक्त केले.

झेंडूची फुले महागली
दसऱ्याला झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. बाजारात उच्च दर्जाचा झेंडू महागला असून एक जाळी ७०० ते ८५० रूपयाला विकत असतांना पाहायला मिळत होती. आपले घर,वाहन, गाड्या इ.ची पुजा करून ग्रामीण भागात दसरा कोरोनाच्या सावटाखाली साजरा झाला. परंतु कोरोनामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण कमी प्रमाणात दिसून आले. (२६ लखमापूर)

Web Title: Dussehra celebrated in Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.