उमेदवारांसाठी दसरा ठरला फलदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 12:40 AM2019-10-09T00:40:19+5:302019-10-09T00:41:17+5:30

नाशिक : ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे ज्याचे वर्णन केले जाते, त्या दसरा सणापासूनच खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला वेग देण्याची वेळ इच्छुकांवर आली आहे. त्यामुळे महानगरासह जिल्हाभरातील इच्छुकांच्या हक्काच्या कार्यकर्त्यांना सकाळपासूनच प्रचाराला लागण्यास सांगण्यात आल्याने सर्वच इच्छुकांचे निकटचे कार्यकर्ते घरचं तोरण बांधून सकाळपासूनच उमेदवारांच्या कार्यालयात जमा होऊन प्रचाराला लागले. सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश नागरिक घरीच असण्याच्या संधीचा लाभ उठवत उमेदवारांनी प्रचार केल्याने मतांच्या सोन्यात भर घालण्यासाठी उमेदवारांसाठी दसरा फलदायी ठरला.

Dussehra proved fruitful for candidates | उमेदवारांसाठी दसरा ठरला फलदायी

उमेदवारांसाठी दसरा ठरला फलदायी

Next
ठळक मुद्दे दसरा सणापासूनच खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे ज्याचे वर्णन केले जाते, त्या दसरा सणापासूनच खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला वेग देण्याची वेळ इच्छुकांवर आली आहे. त्यामुळे महानगरासह जिल्हाभरातील इच्छुकांच्या हक्काच्या कार्यकर्त्यांना सकाळपासूनच प्रचाराला लागण्यास सांगण्यात आल्याने सर्वच इच्छुकांचे निकटचे कार्यकर्ते घरचं तोरण बांधून सकाळपासूनच उमेदवारांच्या कार्यालयात जमा होऊन प्रचाराला लागले. सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश नागरिक घरीच असण्याच्या संधीचा लाभ उठवत उमेदवारांनी प्रचार केल्याने मतांच्या सोन्यात भर घालण्यासाठी उमेदवारांसाठी दसरा फलदायी ठरला.
या दशकात राजकारण आणि प्रचाराचे सगळेच रंग बदलले आहेत. बदलत्या काळात वॉररूम आणि आॅनलाइन प्रचाराला जास्त महत्त्व मिळाले आहे. हे खरे असले तरी निकटचे कार्यकर्ते, तळमळीचे कार्यकर्ते तसेच नातेसंबंधातल्या कार्यकर्त्यांचे महत्त्व यत्किंचितही कमी झालेले नाही. किंबहुना पूर्वीसारखे पक्षाच्या हक्काच्या कार्यकर्त्यांची वानवा झालेली असताना अशा हक्काच्या, घरच्या कार्यकर्त्यांचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा दसºयासारख्या आनंदाचा दिवस आपल्या कुटुंबासह आनंदात व्यतित करावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, प्रचाराचा ज्वर वाढविण्यासाठी तसेच सर्व कुटुंबीय घरी एकत्रित मिळण्यासाठी दसºयाचा सुट्टीचा दिवस उपयुक्त असल्याने कार्यकर्त्यांसह उमेदवार देखील सकाळपासूनच गल्लोगल्ली फिरून संपर्क अभियान राबवू लागले. काही मतदारांनी घेतली फिरकीकाही उमेदवार गल्लोगल्लीतील रस्त्यांवरून फिरत मतदारांना आवाहन करीत होते, तर काहीजण प्रत्यक्ष घरोघरी फिरूनदेखील प्रचार करीत होते. अशावेळी मतदारांच्या घरातून उमेदवारांना शुभेच्छांसह आपट्याची पाने अर्थात सोने देऊन शुभेच्छादेखील दिल्या जात होत्या. मात्र, दोन-चार ठिकाणी काही चतुर मतदारांनी उमेदवारांनाच आम्ही तुमच्या सोन्याची वाट पाहतोय, असे सांगत ऐन प्रचारातदेखील उमेदवारांची फिरकी घेतल्याच्या घटना घडल्या.

Web Title: Dussehra proved fruitful for candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.