शेतपीकांवर धुळीची चादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 07:17 PM2019-12-17T19:17:22+5:302019-12-17T19:18:33+5:30

मागील सहा महिन्यांपासुन कासव गतीने सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील द्राक्षबागांसह शेतपिकांवर धुळीची चादर जमा झाली असून शेतकरी व रहिवाशी मेटाकुटीला आलेला आह

Dust sheet on the farm | शेतपीकांवर धुळीची चादर

शेतपीकांवर धुळीची चादर

Next
ठळक मुद्देपीके धोक्यात : खेडलेझुंगे परिसरात रस्त्याची कामे संथगतीने

खेडलेझुंगे : मागील सहा महिन्यांपासुन कासव गतीने सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील द्राक्षबागांसह शेतपिकांवर धुळीची चादर जमा झाली असून शेतकरी व रहिवाशी मेटाकुटीला आलेला आह
अवकाळीने शेतकर्यांचे कंबरडे मोडलेले असतांना वातावरणातील दैनंदिन बदलावामुळे हैराण झालेला शेतकरी रस्त्यावरील धुळीमुळे मेटाकुटीला आहेला आहे. औषध फवारण्या करु नही पीकांचे आरोग्य धोक्यात आहे. कारण फवारणी केलेली औषध धुळीकण शोषुन घेतात. त्यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर दिसुन येत आहे. दिवसातुन दोन वेळेस औषध फवारणी करण्यात येत आहे परंतु पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसुन येत नाही.
कासवगतीने सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील पीकांवर धुळीची चादर पसरु न पिकांची मोठ्याप्रमाणावर नुकासन होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जाणुबुजुन सदरच्या रस्त्याचे काम अंत्यत धीम्यागतीने करत असल्याचा परिसरात चर्चा सुरु आहे. धारणगांव, खेडला, रु ई, कोळगांव, सारोळेथडी परिसरातुन सिन्नर, शिर्डी,अहमदनगर, पुणे सारख्या शहरांकडे जाण्यासाठीचा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याने दिवस-रात्र वाहनांची मोठ्याप्रमाणावर वाहतुक सुरु असते. शेतकर्यांची शेतीमाल खरेदी, शेतीसाठी उपयुक्त साहीत्य वाहतुक सुरु च असते. केवळ रस्त्याचे काम संतगतीने होत असल्याने रस्त्यावरील धुळीकण हे पिकांवर बसत आहे. त्यामुळे द्राक्ष व कांद्यासारख्या महागड्या पिकांची अतोनात नुकसान होत आहे. रस्त्यावरील वाहनांच्या ये-जा मुळे उडणार्या धुळीचे कण द्राक्षबाग, कांदे, गव्हु, हरभर, कारल्याच्या बांगावर धुळीची चादर पसरलेली आहे.
वातवरणातील सततच्या बदालावामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान होत आहेच. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेही शेतकर्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकासन होत आहे. मागील 6 मिहन्यांपासुन सुरु असलेल्या कामामुळे येथील वाहतुकीस मोठ्याप्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे वाहनांचेही मोठ्याप्रमाणावर नुकासन होत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रु ई-कोळगांव बस सेवा मागील मिहन्यांपासुन बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे परिसरातुन सार्वजनिक बांधकाम विभागावर मोठ्याप्रमाणावर नाराजगी व्यक्त केली जात आहे. पुढील पंधारवाड्यामध्ये सदरील कामे चांगल्या प्रतीमध्ये पुर्ण केले नाही तर गावातील राजकीय पुढारी कठोर पाऊले उचलण्याच्या बेतात आहे.

Web Title: Dust sheet on the farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.