डस्टबिन खरेदी घोटाळा मनपा आयुक्तांनी मागविला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:06 AM2017-12-14T01:06:07+5:302017-12-14T01:10:11+5:30

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी ठिकठिकाणी बसविलेल्या सुमारे २१ लाख रुपये किमतीच्या डस्टबिन खरेदीत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केल्यानंतर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी याबाबतचा अहवाल आरोग्य खात्याकडून मागविला असून, बाजारभाव पडताळणीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनीही या डस्टबिन घोटाळ्यासंदर्भात प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

The Dustbin Purchase Scam was filed by the Municipal Commissioner | डस्टबिन खरेदी घोटाळा मनपा आयुक्तांनी मागविला अहवाल

डस्टबिन खरेदी घोटाळा मनपा आयुक्तांनी मागविला अहवाल

Next
ठळक मुद्देडस्टबिन खरेदी घोटाळा मनपा आयुक्तांनी मागविला अहवालमहापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी याबाबतचा अहवाल आरोग्य खात्याकडून मागविला

नाशिक : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी ठिकठिकाणी बसविलेल्या सुमारे २१ लाख रुपये किमतीच्या डस्टबिन खरेदीत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केल्यानंतर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी याबाबतचा अहवाल आरोग्य खात्याकडून मागविला असून, बाजारभाव पडताळणीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनीही या डस्टबिन घोटाळ्यासंदर्भात प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
पुढील महिन्यात शहरात केंद्र सरकारच्या पथकामार्फत स्वच्छ सर्वेक्षण केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील बाजारपेठ परिसरात ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या डस्टबिन बसविल्या आहेत. मात्र, महापालिकेने अशा डस्टबिन बसवत पुन्हा कचराकुंडीयुक्त शहर निर्माण करण्याचा घाट घातल्याचा आणि या डस्टबिन खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख व विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला होता. सदर डस्टबिन या बाजारात सुमारे दोन ते अडीच हजारात उपलब्ध होत असताना त्यासाठी महापालिकेने ११ हजार १२१ रुपये मोजल्याचेही बोरस्ते यांनी निदर्शनास आणून दिले होते आणि या साºया घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी ‘लोकमत’शी बोलताना डस्टबिन खरेदीसंदर्भात झालेल्या आरोप प्रकरणी आरोग्य विभागाकडून अहवाल मागविण्यात येत असून, बाजारपेठेतील दर आणि प्रत्यक्ष निविदेतील दर याची पडताळणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, महापौर रंजना भानसी यांनीही या डस्टबिन खरेदीबाबत शंका उपस्थित करत या साºया प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपण आयुक्तांकडे करणार असल्याचे सांगितले आहे. वास्तविक, डस्टबिन खरेदीचा विषय हा धोरणात्मक निर्णय असल्याने तो महासभेवर मान्यतेसाठी येणे आवश्यक होते. तो का आला नाही, याची माहिती घेण्यात येईल, असेही महापौरांनी
स्पष्ट केले. धोरणात्मक बाब नाही विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी डस्टबिन खरेदी अथवा कचराकुंड्या लावण्याबाबतचा विषय हा धोरणात्मक असल्याने त्याचा प्रस्ताव महासभेवर का मांडण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता तर महापौर रंजना भानसी यांनीही विरोधी पक्षनेत्यांच्या सुरात सूर मिसळवित सदर बाब धोरणात्मक असताना महासभेवर विषय आणण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. त्याबाबत आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले, राज्य आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच काम सुरू असून डस्टबिन बसविण्याचा निर्णय धोरणात्मक बाब ठरत नाही. त्यामुळे महासभेत तो मांडण्याचा प्रश्नच नाही. शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने सदर निर्णय घेण्यात आलेला असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

Web Title: The Dustbin Purchase Scam was filed by the Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक