कर्तव्यनिष्ठेनेच मिळतो आत्मिक आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:32+5:302021-06-25T04:12:32+5:30
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लोंढे बोलत होते. ...
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लोंढे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते.
यावेळी लोंढे यांनी आपले अनुभव कथन केले. प्राध्यापकांचे पुस्तकातील ज्ञान आणि पुस्तकांच्या पलीकडील जीवनानुभव समृद्ध असेल तर विद्यार्थी समृद्ध होतील. शिक्षक, प्राध्यापक विद्यार्थ्यांसाठी रोलमॉडेल असले पाहिजेत. आत्मिक समाधानासाठी कर्तव्यनिष्ठा महत्त्वाची आहे, असेही लोंढे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पीएच. डी. पदवी प्राप्त डॉ. रघुनाथ वाकळे, डॉ. अरूण वनारसे, डॉ. शरद चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. गमे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, नॅक समन्वयक डॉ. मनिषा गायकवाड, वरिष्ठ लिपीक देवीदास बागुल उपस्थित होते. प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रमुख प्रा. कैलास बच्छाव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. बापू शेलार यांनी केले.
फोटो - २४ येवला लोंढे
येवला महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना न्या. विनायकराव लोंढे. समवेत प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, उपप्राचार्य शिवाजी गायकवाड.
===Photopath===
240621\24nsk_43_24062021_13.jpg
===Caption===
फोटो - २४ येवला लोंढे येवला महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना न्या. विनायकराव लोंढे. समवेत प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, उपप्राचार्य शिवाजी गायकवाड.