रंगात रंगणार दत्त पालखी सोहळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 10:37 PM2020-03-12T22:37:37+5:302020-03-12T22:39:41+5:30

कसबे सुकेणे : महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ व संपूर्ण राज्यात प्रति गाणगापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोत्सवास शुक्रवारपासून (दि.१३, रंगपंचमी) प्रारंभ होत आहे. सप्तरंगात रंगणाऱ्या या पालखी सोहळ्यावर कोरोनो या संसर्गजन्य आजाराच्या भीतीचे सावट असले तरीही जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून भाविक दाखल झाले आहेत.

Dutt Palakhi Ceremony to be held in color! | रंगात रंगणार दत्त पालखी सोहळा !

श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील दत्त मंदिर, चौकटीत एकमुखी दत्तप्रभू.

Next
ठळक मुद्देश्रीक्षेत्र मौजे सुकेणे : दत्त यात्रोत्सवास प्रारंभ, तयारी पूर्ण, भाविकांचा उत्साह; वाढीव पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे सुकेणे : महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ व संपूर्ण राज्यात प्रति गाणगापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोत्सवास शुक्रवारपासून (दि.१३, रंगपंचमी) प्रारंभ होत आहे. सप्तरंगात रंगणाऱ्या या पालखी सोहळ्यावर कोरोनो या संसर्गजन्य आजाराच्या भीतीचे सावट असले तरीही जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून भाविक दाखल झाले आहेत.
मौजे सुकेणेची दत्त यात्रा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. रंगाची यात्रा म्हणून ही यात्रा राज्यभरात ओळखली जाते. श्रीक्षेत्र मौजे सुकेणे हे महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ असून, याठिकाणी चक्रधर स्वामींचा एक दिवसाचा मुक्काम होता. या यात्रेला पेशवेकालीन परंपरा असून, दत्त प्रभू पालखीपुढे उधळणारा रंग हा प्रसाद म्हणून भाविक अंगावर घेतात, अशी येथे श्रद्धा आहे.
पाच दिवस चालणाºया या यात्रेत संपूर्ण देशातील महानुभाव पंथीय भाविक सहभागी होतात. याठिकाणी विडा अवसर, नारळ, ही पूजा देवाला भाविक आवर्जून वाहतात व नवसपूर्ती करतात. यात्रेत रेवडी, गुढीपाडव्याचे गोड हार-कडे, गोडीशेव, जिलेबी याची मोठ्या प्रमाणात विक्र ी होते.
यात्रेच्या पूर्वसंध्येला राज्याच्या विविध भागातून यात्रेकरू भाविक, महानुभाव संत-महंत व व्यावसायिक डेरेदाखल झाल्याने श्रीक्षेत्र मौजे सुकेणे गजबजले आहे.पालखीपुढे रंगांची उधळण चार दिवस चालणाºया उत्सवास दि. १३ मार्चपासून रंगपंचमीपासून दत्त पालखी सोहळ्याने प्रारंभ होत आहे. रंगपंचमीच्या दिवशी दुपारी पूर्व महाप्रवेशद्वारातून मान्यवरांच्या हस्ते पालखी, चरणांकित स्थान यांची महापूजा होणार असून, त्यानंतर पालखीचे प्रस्थान होणार आहे. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे पालखीपुढे रंगांची होणारी उधळण आणि भाविकांचा जल्लोष पाहण्यासारखा असतो. सुमारे दीड ते दोन लाख भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होतात. सुमारे तेरा तास हा सोहळा रंगपंचमीच्या दुपारपासून ते दुसºया दिवशी पहाटेपर्यंत सप्तरंगात न्हाऊन निघतो. नाशिक, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नगर आणि गुजरात राज्यातील भाविक या यात्रेत सहभागी होतात.सुकेणेत अवरले चैतन्यपर्व भैरवनाथ-जोगेश्वरी, दवप्रभू यांची यात्रा आणि दावशावली बाबा यांचा उरूस असा सलग पाच दिवसांचा उत्सव होत असल्याने सध्या परिसर दुमदुमला आहे. गावातील रस्ते, मंदिरे, बाजारपेठ विद्युत रोषणाईने झळाळले असून, बाहेरगावचे भाविक आणि व्यावसायिक डेरेदाखल झाल्याने चैतन्य पर्व निर्माण झाले आहे.ग्रामपालिकेकडून जय्यत तयारी, मंदिराला विद्युत रोषणाई, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही दत्त मंदिर संस्थान आणि ग्रामपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यात्रेकरू भाविकांना जागा, पाणी, विजेची व्यवस्था तसेच बाणगंगा नदीपात्राची स्वच्छता करून दरवर्षीप्रमाणे नदीपात्रातही रहाट पाळणे, व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच सुरेखा चव्हाण व उपसरपंच सचिन मोगल यांनी दिली. दत्त मंदिर संस्थानाच्या वतीने पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मंदिराला रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
४मंदिरात भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही
कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे.
४भाविकांना सुलभ दर्शनासाठी महिला व पुरु षांसाठी एकेरी दर्शन रांगेची व्यवस्था दत्त मंदिराने केली आहे, अशी माहिती महंत पूज्य मनोहरशास्त्री सुकेणेकर, बाळकृष्णराज सुकेणेकर, अर्जुनराज सुकेणेकर, पूज्य राजधरराज सुकेणेकर व सुकेणकर संत परिवाराने दिली.कोरोनामुळे स्वच्छता पाळण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या सूचनेप्रमाणे यात्राकाळात भाविकांनी वैयक्तिक स्वच्छता पाळावी, भाविकांनी मास्क वापरावे, कुठल्याही वस्तूला हात लावल्यानंतर सतत स्वच्छ हात धुवावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Dutt Palakhi Ceremony to be held in color!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.