दत्तनगर, चोंढी ग्रामपंचायत बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:15 AM2021-01-03T04:15:21+5:302021-01-03T04:15:21+5:30
-------------- वाढलेली थंडी रब्बी पिकांसाठी फायदेशीर सिन्नर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला वाढला आहे. रात्री थंडी ...
--------------
वाढलेली थंडी रब्बी पिकांसाठी फायदेशीर
सिन्नर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला वाढला आहे. रात्री थंडी आणि दिवसभर स्वच्छ आकाश आणि ऊन अशा बदलेल्या हवामानाचा रब्बी पिकांना फायदा होतो. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरबऱ्यासह इतर पिके बहरल्याने बळीराजा समाधानी दिसत आहे. अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाले असल्याने रब्बी हंगामात तरी शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.
--------------
मास्कमुळे इतर आजारांनाही बसला आळा
सिन्नर : कोविडसारख्या साथीच्या आजाराचा फैलाव थांबविण्यासाठी नियमित मास्क वापरणे, योग्य सामाजिक अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहने आरोग्य विभागाने वारंवार केले होते. मास्क वापरल्याने केवळ कोविडपासूनच संरक्षण मिळाले नाही, तर अनेक आजारांवर नियत्रंण आले असल्याचा दावा केला जात आहे. नियमित मास्कचा वापर केल्यामुळे बाधित रुग्णामार्फत प्रादूर्भाव होणाऱ्या कोविड १९ या साथीच्या आजारावर नियंत्रण आले आहे.
------------------
वेगवेगळ्या चिन्हावर लढावे लागणार
सिन्नर : येत्या १५ तारखेला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच पॅनलमधील उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नेते पॅनल तयार करून उमेदवार निवडणुकीला सामोरे जातात. असे असले, तरी कुठल्याच एका पॅनलला ठरावीक एकच चिन्ह मिळणार नाही, तर वेगवगेळ्या चिन्हांवर लढावे लागणार आहे. यामुळे प्रचार कार्यादरम्यान उमेदवारांना मतदारांना आपले चिन्ह मतदारांच्या मनात बिंबविण्यासाठी चांगलीच दमछाक करावी लागणार आहे.
---------------
नॉयलॉन मांजाची छुप्या मार्गाने विक्री
सिन्नर : शहर व तालुक्यात नॉयलॉज मांजाची छुप्या मार्गाने विक्री होत असल्याने ठिकठिकाणी दिसून येणाऱ्या नॉयलॉन मांजामुळे दिसून येत आहे. नाशिक शहरात या मांजामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर छुप्या मार्गाने विक्री होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. सिन्नर व्यापारी संघटनेने सर्वांना नायलॉन मांजा विक्री करू नये, असे आवाहन केले आहे.