केवळ बसेस ‘स्टार्ट’ करण्यासाठीच ड्युटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 09:32 PM2020-04-12T21:32:52+5:302020-04-13T01:42:04+5:30
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रकारची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस डेपो आणि वर्कशॉपमध्ये उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. या बसेस सध्या मागार्वर धावत नसल्या तरी गाड्या बंद ठेवून त्यात बिघाड होऊ नये यासाठी फक्त बसेस सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे.
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रकारची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस डेपो आणि वर्कशॉपमध्ये उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. या बसेस सध्या मागार्वर धावत नसल्या तरी गाड्या बंद ठेवून त्यात बिघाड होऊ नये यासाठी फक्त बसेस सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क झालेल्या शासकीय यंत्रणेपैकी राज्य प परिवहन महामंडळ हे एक असून, महामंडळाने सर्वप्रथम प्रवासी वाहतूक बंद करून कोरोना रोखण्यासाठीचे पाऊल उचलले. प्रवासातून कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंग सर्वप्रथम राबविण्यात आले होते. प्रवाशांच्या हाताला सानिटाइझर लावण्याचा प्रयोगदेखील महामंडळाने राबविला. कारोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाल्यानंतर राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार केवळ पाच टक्के कर्मचारी कामावर ठेवण्यात येत असल्याने परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनादेखील तसे नियोजन करावे लागले. त्यामुळे कमी कर्मचारी देखभाल दुरुस्तीच्या कामावर आहेत.
सध्या कोण्यातही प्रकारच्या बसेस सुरू नसल्याने चालक-वाहकांना रजा देण्यात आलेली आहे. परंतु काही तांत्रिक कामगारांना उभ्या असलेल्या बसेस केवळ सुरू करून बॅटरी आणि इंजिन चार्ज करण्यासाठीची ड्युटी देण्यात आली आहे. त्यानुसार काही कर्मचारी सध्या केवळ उभ्या असलेल्या बसेस सुरू करण्यासाठी कामावर येत आहेत. साधारपणे पंधरा ते वीस मिनिटे बस सुरूच ठेवली जाते. जेणे करून बसची बॅटरी चार्ज राहील तसेच इंजिनदेखील कोरेडे पडणार नाही यासाठी सध्या जागेवरच बसेस सुरू केलय जात आहेत. काही बसेस धुतल्याही जात आहेत.
महामंडळाचे पेठरोड येथेही वर्कशॉप आहे. तेथे काही बसेस उभ्या करण्यात आलेल्या आहेत.
परंतु कर्मचारी कामावर बोलविण्याला मर्यादा असल्याने वर्कशॉपमधील दुरुस्तीची कामेदेखील काही प्रमाणात बंद आहेत. किरकोळ स्वरूपातील कामे होत असली तरी ती कर्मचारी संख्या पुरेशी नसल्याने दुरुस्तीची मूळ कामेदेखील पूर्ण क्षमतेने होताना दिसत नाही.