ग्रामीण भागातील दवंडी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 10:46 PM2020-12-01T22:46:11+5:302020-12-01T23:58:29+5:30
चांदोरी : पूर्वी शासकीय असो की निमशासकीय, कुठलाही कार्यक्रम असल्यास दवंडी देऊन ग्रामस्थांना निमंत्रण देण्याची परंपरा होती. काळानुसार दवंडीची प्रथा आता हद्दपार झाली आहे. दवंडीच्या जागी आता मोबाइलवरील ग्रुपवर मेसेज पाठवून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे गटातील दवंडीचा आवाज ऐकावयास मिळत नाही.
चांदोरी : पूर्वी शासकीय असो की निमशासकीय, कुठलाही कार्यक्रम असल्यास दवंडी देऊन ग्रामस्थांना निमंत्रण देण्याची परंपरा होती. काळानुसार दवंडीची प्रथा आता हद्दपार झाली आहे. दवंडीच्या जागी आता मोबाइलवरील ग्रुपवर मेसेज पाठवून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे गटातील दवंडीचा आवाज ऐकावयास मिळत नाही.
निफाड तालुक्यातील भरपूर गावात पूर्वीच्या काळात शासनाच्या योजनांची माहिती असो की ग्रामसभा, त्याचे जगजाहीरपणे दवंडी देऊन सूचना दिल्या जात असत. ग्रामपंचायतमधील कुठलाही व गावातील शासकीय कार्यक्रमाची सूचना दवंडी देऊनच कळवली जायची. त्यामुळे लोकांना घरपोच माहिती मिळायची. दवंडीचा आवाज आला की काहीतरी कार्यक्रम आहे हे निश्चित व्हायचे. तसेच योजनेची माहिती फॉर्म, भरण्याची सूचना, ग्रामसभा असल्याचेही समजत असे. परंतु या आधुनिक काळात हा प्रकार ग्रामीण भागात बंद पडल्यात जमा झाला आहे. दवंडीमुळे वाचासारखी गोष्ट प्रसारित होत होती. दवंडीच्या जागी आता कुठलाही कार्यक्रम असो शासकीय योजनांची माहिती, ग्रामसभेची सूचनाही सोशल मीडियाद्वारे ग्रुपवर टाकल्या जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात घुमणारा आवाज लुप्त झाला आहे.
गावातील ग्रामसभेची सूचना दवंडीतून पूर्वी कळायची. त्यामुळे मोठी गर्दी असायची. वादळी चर्चा व्हायची तसेच जे नागरिक ग्रामसभेला हजर नसल्यास संबंधित व्यक्ती उपस्थित ग्रामसभेत काय झाले याची कुतूहलाने माहिती घ्यायचा. परंतु आता सोशल मीडियावर किंवा फलकावर ग्रामसभेच्या सूचना देऊ लागल्याने अनेकांना ग्रामसभेची माहिती पोहोचताना दिसत नाही. मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये ग्रामसभा होताना पाहावयास मिळत आहे. ग्रामसभेला महत्त्वप्राप्त झाले तरी लोकांच्या अनुउपस्थितीमुळे चर्चेविना ग्रामीण भागात ग्रामसभा होत आहे.
ग्रामीण भागातील दवंडीचा प्रकार हद्दपार झालेला दिसतो.
दवंडीतून प्रसारित होणारी माहिती वेगाने लोकांना समजायची; परंतु सोशल मीडियातून मोजक्या लोकांपर्यंत पोहोचताना दिसत आहे. विशेष म्हणजे या दवंडीची चर्चा गावभर व्हायची. त्यामुळेच कोणी दवंडी नाही ऐकली तरी संदेश मात्र मिळायचा आता प्रत्येकाकडे मोबाइल असला तरीही त्यातील संदेश वाचण्याइतकीही फुरसत कोणाला नसल्याचे चित्र हाहे.
ऐका हो ऐका ...
ग्रामीण भागातील दवंड्या ऐका हो ऐका असे म्हणत शासकीय योजनांची असो की, जनजागृती मोहीम त्याची दवंडी द्यायचा. त्यामुळे लोक थेट माहिती मिळत असल्याने लक्षपूर्वक ऐकायचे. काही प्रश्न असल्यास उपस्थित करायचे; परंतु आता दवंडीही ग्रामीण भागातून हद्दपार झाली आहे.