वैतरणा धरणाच्या कॅनॉलमध्ये बुडून इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:51 AM2018-11-19T00:51:56+5:302018-11-19T00:52:10+5:30
पाणी घेण्यासाठी वैतरणा धरणाच्या नवीन कॅनॉलमध्ये उतरलेल्या इसमाचा पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
नाशिक : पाणी घेण्यासाठी वैतरणा धरणाच्या नवीन कॅनॉलमध्ये उतरलेल्या इसमाचा पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथील चाफ्याची वाडी येथील बुधा सावळीराम लचके (५५) हे शनिवारी रात्री पाणी घेण्यासाठी वैतरणा धरणाच्या नवीन कॅनॉलमध्ये गाड्यांना उतरण्यासाठी असलेल्या रॅम्पमध्ये उतरले असता पाय घसरून ते कॅनॉलमध्ये पडले. पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे. दरम्यान सदर इसमाने मद्यप्राशन केले असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. या परिसरात सर्रासपणे अवैध गावठी दारूची विक्री होत असून, त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे.