खामखेड्यात बिबट्या मृतावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 04:17 PM2020-01-17T16:17:26+5:302020-01-17T16:17:37+5:30
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा शिवारात शुक्रवारी काळखडी - कळवण रस्त्याच्या उत्तर बाजूला विजपकेंद्राजवळ मक्याच्या शेतात साधारणत: दोन वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला.
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा शिवारात शुक्रवारी काळखडी - कळवण रस्त्याच्या उत्तर बाजूला विजपकेंद्राजवळ मक्याच्या शेतात साधारणत: दोन वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला.
काळखडी शिवारातील विजपकेंद्राजवळ उत्तर बाजूला पार्वताबाई रामदास शेवाळे यांच्या गट नं ३२१ मध्ये त्यांचा नातु शेतातील पिकाला पाणी भरण्यासाठी गेला.त्याला मक्याच्या शेतात पडलेला बिबट्या दिसला.बिबट्या हालचाल करत नसल्यामुळे निळकंठ पाटील यांनी गावातील ग्रामस्थांना कळवत वनविभागास कळवले . वनविभागाच्या देवळा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख, वनपरिमंडळ अधिकारी डी पी गवळी ,वन कमिटीचे अध्यक्ष दीपक मोरे,वनरक्षक शांताराम आहेर,सरपंच संजय मोरे,वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील,बापू शेवाळे,सुनिल शेवाळे आदींनी सकाळी दहाच्या सुमारास घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांसमवेत पंचनामा करून बिबट्याला देवळा वनविभागाच्या गाडीतून वनविभागाच्या कार्यालयात नेले. त्याच्यावर देवळा पशुधन वैद्यकीय अधिकार्यांना पाचारण करून शवविच्छेदन केले जाणार असल्याचे सांगितले त्यानंतरच मृत्यूचे कारण कळेल असे वनविभागाने सांगितले.