नवीन वर्षात बीएसएनएल ग्राहकांना मिळणार ई बील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:34 PM2018-12-27T12:34:39+5:302018-12-27T12:36:42+5:30

भारत संचार निगमच्या लिमिटेड (बीएसएनल)ग्राहकांना नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०१९ पासून  केवळ ई -बील उपलब्ध होणार आहे. नवीन वर्षात बीसएनल सर्व प्रकारच्या लँड-लाइन , मोबाइल तसेच ब्रॉड-बँड,एफटीटीएच ग्राहकांना छापील बिला ऐवजी केवळ ई-बिल देणार आहे.  छापील बिल ही प्रक्रिया अस्तित्वातच असणार नाही. त्यामुळे यापुढे छापील बील देणे शक्य होणार नसल्याचे बीएसएनएलने स्पष्ट केले असून डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे बीएसएनलकडून सांगण्यात आले आहे. 

E-bill to get BSNL customers in the new year | नवीन वर्षात बीएसएनएल ग्राहकांना मिळणार ई बील

नवीन वर्षात बीएसएनएल ग्राहकांना मिळणार ई बील

Next
ठळक मुद्देबीएसएनएल ग्राहकांना नवीन वर्षात मिळणार ई-बीलडीजिटल इंडियांतर्गत बीसएनएलने घेतला निर्णयपर्यावरण संरक्षणासाठी निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण

नाशिक : भारत संचार निगमच्या लिमिटेड (बीएसएनल)ग्राहकांना नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०१९ पासून  केवळ ई -बील उपलब्ध होणार आहे. नवीन वर्षात बीसएनल सर्व प्रकारच्या लँड-लाइन , मोबाइल तसेच ब्रॉड-बँड,एफटीटीएच ग्राहकांना छापील बिला ऐवजी केवळ ई-बिल देणार आहे.  छापील बिल ही प्रक्रिया अस्तित्वातच असणार नाही. त्यामुळे यापुढे छापील बील देणे शक्य होणार नसल्याचे बीएसएनएलने स्पष्ट केले असून डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे बीएसएनलकडून सांगण्यात आले आहे. 
नाशिक जिल्यातील ९० %  ग्राहकांनी त्यांचा मोबाइल क्रमांक ई-बिलींग प्रणालीसाठी नोंदणीकृत केलेला आहे. ही स्वागतार्ह बाब असुन उर्वरित ग्राहकांनीही मोबाइल क्रमांक या प्रणालीशी जोडून घ्यावा तसेच बिलाची प्रत मिळविण्यासाठी ग्राहकांनी आपल्या ई-मेल आईडी ची नोंदणी करून घ्यावी, अशी सूचना बीसएनलने केली आहे. ई-बिलासाठी ग्राहक मोबाइल नंबर किंवा ई-मेल  आईडी ची नोंदणी (रजिस्ट्रेशन) वरिष्ठ महाप्रबंधक दूरसंचार कार्यालय, कॅनडा कॉर्नर येथील राजस्व (टी. आर. ए.) अनुभाग येथे किंवा जवळच्या  ग्राहक सेवा केंद्र्रात तसेच  aoabhay777@gmail.com  या ई-मेल  आयडी वर ई-मेल ही करू शकता. तसेच मोबाइल क्रमांक 8275864616 आणि 8275864617 यावर व्हाट्सअप संदेशद्वारे आपला कार्यरत दूरध्वनी क्रमांकाशी सबंधित मोबाइल क्रमांक व ई-मेल आईडी सादर करू शकता जेणेकरून त्याची नोंदणी करता येईल. ई बील मिळविण्यासाठी नोंदणी करणाºया ग्राहकांना दरमहा टेलीफोन बिलात दहा रुपयांची सवलत देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ महाप्रबंधक  नितिन महाजन यांनी दिली आहे.

Web Title: E-bill to get BSNL customers in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.