दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-गृहप्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:51+5:302021-06-16T04:20:51+5:30
नाशिक : महाआवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मंगळवारी दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील चार लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाच्या ...
नाशिक : महाआवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मंगळवारी दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील चार लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाच्या चाव्या देण्यात आल्या.
केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची अंमलबजावणी गतिमान करून त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत विभागात महाआवास अभियान-ग्रामीण राबविण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आयोजित ई-गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते जिल्ह्यातील चार घरकुल लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात चाव्या प्रदान करण्यात आल्या.
या कार्यक्रमात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील गौळाणे येथील मीराबाई शिवराम चुंबळे, निफाड तालुक्यातील कसबे सुकणे येथील पुंजाराम कारभारी चारोस्कर यांना प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेंतर्गत ई-गृहप्रवेश चावी प्रदान करण्यात आली, तर धोंडेगाव येथील भास्कर राजाराम पगारे यांना रमाई आवास योजनेंतर्गत, तर सिन्नर तालुक्यातील वडजिरी येथील रामदास दत्तू आंबेकर यांना शबरी आवास योजनेंतर्गत अभियान कालावधीमध्ये पूर्ण झालेल्या या घरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश करण्यात आला.
महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालय येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातून आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह उपायुक्त (विकास) अरविंद मोरे, सहआयुक्त प्रतिभा संगमनेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
===Photopath===
150621\15nsk_31_15062021_13.jpg
===Caption===
महाआवास योजनेत घरकुलाची चावी मिळालेले पुंजाराम चारोस्कर,भास्कर पगारे,मिराबाई चुंबळे,रामदास आंबेकर