पांगरी, कीर्तांगळी येथे ई-मॅरथॉन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 09:52 PM2020-11-20T21:52:05+5:302020-11-21T00:52:12+5:30
सिन्नर : सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट ॲण्ड ॲक्टिव्हिटीज व सेव्ह द चिल्डन संस्थेने स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकास हे लक्ष्य समोर ठेवून १५ ते १९ नोव्हेंबरपर्यंत ई-मॅरेथॉन व जागतिक शौचालय दिवसाचे आयोजन केले आहे.
सिन्नर : सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट ॲण्ड ॲक्टिव्हिटीज व सेव्ह द चिल्डन संस्थेने स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकास हे लक्ष्य समोर ठेवून १५ ते १९ नोव्हेंबरपर्यंत ई-मॅरेथॉन व जागतिक शौचालय दिवसाचे आयोजन केले आहे. १९ नोव्हेंबर, जागतिक शौचालय दिवस असून, या दिवसाचे औचित्य साधून ई-मॅरेथॉन स्पर्धेचा समारोप सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी, पांगरी बुद्रुक या गावात करण्यात आला. तसेच जागतिक शौचालय दिवस कार्यक्रमही साजरा करण्यात आला. कार्यक्रमात खेळाच्या माध्यमातून उघड्यावरील शौचालयाचे परिणाम तसेच त्या बाबतचे महत्त्व आणि शौचालय वापरण्याचे फायदे विशद केले. सद्यपरिस्थिती पाहता आरोग्यासाठी नियमित व्यायाम करण्याचे फायदे याचेही मार्गदर्शन करण्यात आले. सीवायडीए या संस्थेचे संस्थापक मॅथ्यू मट्टम व संचालक प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण भारतात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिन्नर तालुक्यातील २० गावातील सर्व वयोगटातील ग्रामस्थांचा सहभाग होता. पांगरी येथे पंचायत समितीचे सदस्य रवींद्र पगार यांच्या मार्गदर्शनातून सीवायडीए संस्थेचे प्रकल्प समन्वयक योगेश नेरपगार यांच्या हस्ते सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. कीर्तांगळी येथील समारोपाच्या कार्यक्रमात ग्रामसेवक बोरसे, सरपंच दगू निवृत्ती चव्हाणके, आशा कर्मचारी व अंगणवाडीसेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.