कोरोना रुग्ण नियंत्रणाची जबाबदारी प्रत्येक गावाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:55+5:302021-07-03T04:10:55+5:30

येवला : ग्रामीण भागात ज्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे, त्या ठिकाणी पुन्हा रुग्णसंख्या वाढणार नाही, ...

Each village is responsible for corona patient control | कोरोना रुग्ण नियंत्रणाची जबाबदारी प्रत्येक गावाची

कोरोना रुग्ण नियंत्रणाची जबाबदारी प्रत्येक गावाची

Next

येवला : ग्रामीण भागात ज्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे, त्या ठिकाणी पुन्हा रुग्णसंख्या वाढणार नाही, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक गावाची असल्याची सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात येवला व निफाड तालुक्यांतील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांवर स्थिर झाली आहे. रुग्णसंख्या कमी होत नाही, ही चिंतेची बाब असून ही शून्य होणे अतिशय गरजेचे आहे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या शून्य झाली आहे, त्या ठिकाणी पुन्हा रुग्ण वाढणार नाही, यासाठी काळजीपूर्वक नियोजन करण्यात यावे. तसेच कोरोनाच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. गृहविलगीकरणातील रुग्णांच्या दररोज घरी जाऊन तपासणी करण्यात येऊन त्यांना घरी राहण्याची व्यवस्था नसेल तर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात यावे. जिल्ह्यातील ऑक्सिजन जनरेशन प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशा सूचनाही भुजबळ यांनी केल्या.

इन्फो

आर्थिक मदतीचे वाटप

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील अपघातात निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सामाजिक न्याय विभागामार्फत २० लाभार्थींना प्रत्येकी रुपये २० हजारांच्या मानधनाचे वाटप भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दुबार पेरणीचे संकट लक्षात घेता पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचेही आवाहन भुजबळ यांनी केले.

फोटो- ०२ येवला भुजबळ

येवला येथे कोरोना आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ.

020721\02nsk_35_02072021_13.jpg

फोटो- ०२ येवला भुजबळ येवला येथे कोरोना आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ. 

Web Title: Each village is responsible for corona patient control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.