अवकाळी पावसाने पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 01:06 AM2019-12-26T01:06:37+5:302019-12-26T01:07:05+5:30

नाशिक : थंडीचा गारवा वाढत असतानाच जिल्ह्यात बुधवारी (दि.२५) अवकाळी पावसाने हजेरी लावली. निफाड, नांदगाव, सिन्नर तालुक्यात झालेल्या या पावसाने द्राक्षपिकासह कांदा लागवड धोक्यात आली असल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.

Early rains threaten crops | अवकाळी पावसाने पिके धोक्यात

अवकाळी पावसाने पिके धोक्यात

Next
ठळक मुद्देशेतकरीवर्गात चिंतेची भर पडली

नाशिक : थंडीचा गारवा वाढत असतानाच जिल्ह्यात बुधवारी (दि.२५) अवकाळी पावसाने हजेरी लावली. निफाड, नांदगाव, सिन्नर तालुक्यात झालेल्या या पावसाने द्राक्षपिकासह कांदा लागवड धोक्यात आली असल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. बुधवारी पहाटे पिंपळगाव बसवंत भागात मुसळधार पाऊस पडल्याने द्राक्षबागांना त्याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, कांदा रोपांचेही मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच कांदा रोपांची टंचाई भासत असताना आता अवकाळी पावसानेही संकट उभे केल्याने शेतकरीवर्गात चिंतेची भर पडली आहे.

Web Title: Early rains threaten crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.