वर्षी लवकर या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:33 AM2017-09-07T00:33:28+5:302017-09-07T00:33:35+5:30
गणरायाला साकडे : मिरवणुकीत जोश, ढोल-ताशांचा गजर, पुष्पवृष्टीपुढच्या वर्षी लवकर या... नाशिक : ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करीत तसेच ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करीत गणेशभक्तांनी वाजतगाजत लाडक्या बाप्पाला निरोप दिला ते पुढील वर्षी लवकर या, असे साकडे घालूनच! तब्बल अकरा तास चाललेल्या मुख्य मिरवणुकीत डीजे बंदीमुळे पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाईच नव्हे तर आबालवृद्ध थिरकले आणि उत्सवमूर्ती बाप्पाचे रूप डोळ्यात साठवत हजारो भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला.
गणरायाला साकडे : मिरवणुकीत जोश,
ढोल-ताशांचा गजर, पुष्पवृष्टीपुढच्या वर्षी लवकर या...
नाशिक : ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करीत तसेच ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करीत गणेशभक्तांनी वाजतगाजत लाडक्या बाप्पाला निरोप दिला ते पुढील वर्षी लवकर या, असे साकडे घालूनच! तब्बल अकरा तास चाललेल्या मुख्य मिरवणुकीत डीजे बंदीमुळे पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाईच नव्हे तर आबालवृद्ध थिरकले आणि उत्सवमूर्ती बाप्पाचे रूप डोळ्यात साठवत हजारो भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला. गेल्या अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या चैतन्यपर्वाची मंगळवारी विसर्जन मिरवणुकांनी सांगता झाली. शहरवासीयांचे लक्ष लागून असलेल्या मुख्य मिरवणुकीसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विशेषत: वरुणराजाने कृपा केल्याने दुपारी एक वाजेच्या सुमारास वाकडी बारव येथे पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते गणरायाचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
यावेळी आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, उपमहापौर प्रथमेश गिते यांच्यासह अन्य मान्यवरांवर कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती उपस्थित होते. मानाच्या अग्रमानांकित मनपाच्या गणपती मिरवणुकीतील वरद नायक याने ढोल-ताशांच्या तालावर गणेशभक्तांबरोबरच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबरच सर्वच लोकप्रतिनिधींनी ठेका धरला आणि मिरवणुकीला प्रारंभ झाला. वरदविनायक, शिवनाद, शिवराय, माउली, गुलालवाडी यांसह अन्य सर्वच ढोल पथकांनीपालकमंत्र्यांचे ढोलवादन अन् लेजीम चालपालकमंत्री गिरीश महाजन यांनाही ढोल पथकामधील वादक अन् गुलालवाडी व्यायामशाळेच्या चिमुकल्यांच्या लेजीम पथकाचा उत्साह बघून मोह आवरता आला नाही. महाजन यांनीही कमरेला ढोल बांधत चक्क ढोल वाजवित बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. त्याचप्रमाणे गुलालवाडीच्या लेजीम पथकामध्ये सहभागी होत हातात लेजीम घेऊन ‘मोर चाल’ खेळत पथकामधील बालकांचा उत्साह वाढविला. चक्क मंत्री आपल्यासोबत लेजीम खेळत असल्याचे बघून बालकांचा उत्साह द्विगुणित झाला अन् लेजीमचा आवाज घुमू लागला.