विमानतळाची जमीन दाखवून कोट्यवधींची कमाई; नाशिकमध्ये तीघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 05:46 PM2018-02-01T17:46:01+5:302018-02-01T17:50:22+5:30

या पाच संशयितांनी २०१३ साली जळगावमध्ये प्रॉपर्टी मेळावा घेतला. या मेळाव्यात प्लॉटसाठी बहुसंख्य नागरिकांकडून आगाऊ नोंदणी करून घेतली. त्यानंतर कॅनडा कॉर्नर येथील पाटील प्लाझा या संकुलात मोरया कन्स्ट्रूवेल प्रा. लि. नावाने कार्यालय उघडले.

Earning billions of dollars by showing the land of the airport; Three arrested in Nashik | विमानतळाची जमीन दाखवून कोट्यवधींची कमाई; नाशिकमध्ये तीघांना अटक

विमानतळाची जमीन दाखवून कोट्यवधींची कमाई; नाशिकमध्ये तीघांना अटक

Next
ठळक मुद्दे या पाच संशयितांनी २०१३ साली जळगावमध्ये प्रॉपर्टी मेळावा घेतला.पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले

नाशिक : कोपरगावच्या काकडी विमानतळाजवळ प्लॉट देण्याचे आमिष दाखवून आगाऊ बुकिंग करत भामट्यांनी जळगावला प्रॉपर्टी मेळा भरविला आणि राज्य शासनाने विमानतळासाठी हस्तांतरित केलेल्या जमिनीवर कोट्यवधींची कमाई करून सुमारे आठशे नागरिकांची आगाऊ नोंदणी प्लॉटधारक म्हणून केली. तसेच आठ तक्रारदारांची २३ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जळगाव जिल्ह्यातील यशवंत कॉलनीमधील सेवानिवृत्त बॅँक कर्मचारी सुरेश खंडेराव पाटील (६६) यांनी नाशिकमधील कामटवाडे व सिडको परिसरातील रहिवासी असलेले संशयित सुनील मारुती ढोली, जितेंद्र अशोक जगताप, योगेश सुभाष विश्वंभर, किरीट दगडू सद्गीर व दगडू पाटील या पाच व्यक्तींविरुद्ध फिर्याद सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. या पाच संशयितांनी २०१३ साली जळगावमध्ये प्रॉपर्टी मेळावा घेतला. या मेळाव्यात प्लॉटसाठी बहुसंख्य नागरिकांकडून आगाऊ नोंदणी करून घेतली. त्यानंतर कॅनडा कॉर्नर येथील पाटील प्लाझा या संकुलात मोरया कन्स्ट्रूवेल प्रा. लि. नावाने कार्यालय उघडले आणि काकडी शिवारात भविष्यात विमानतळ होणार असून जागेला मोठा भाव मिळणार असल्याचे सांगून शासनाची जमीन दाखवून सदर जागेवर भूखंड पाडले जातील, असे सांगून स्वस्त रकमेचे आमिष दाखविले. यानंतर प्रत्येकाकडून ५०० ते १००० रुपये नोंदणीच्या नावाखाली गोळा केले. सध्या आठ तक्रारदार पोलिसांपर्यंत पोहचले असून, त्यांनी एकूण २३ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

असा जिंकला विश्वास
शासनाने काकडीच्या विमानतळासाठी हस्तांतरित केलेली जमीन दाखवून प्लॉट घेण्यासाठी इच्छुक असलेल्या सुमारे ७९९ नागरिकांचा विश्वास संपादन केला. मोरया कन्स्ट्रूवेल कंपनीच्या पाच भामट्यांनी गैरप्रकार केला. अवैधरीत्या नागरिकांकडून पैसा जमा करून घेत त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. प्रारंभी सात ते आठ तक्रारदारांची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे.

वेळोवेळी उकळले पैसे
या पाच भामट्यांनी बनावट कंपनीच्या नावाने एका खासगी बॅँकेत खाते उघडले. प्लॉटधारक म्हणून नोंदणी केलेल्या नागरिकांकडून वेळोवेळी एक लाख ते पाच लाखांपर्यंत पैसे उकळले आणि जमा झालेली रक्कम बॅँक खात्यात भरली. प्लॉट एनए झाल्यानंतर विक्री करणार असल्याचे सांगून ७९९ प्लॉटधारकांची नोंदणी क रून घेतली आहे.

 

Web Title: Earning billions of dollars by showing the land of the airport; Three arrested in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.