दळवटला भूकंपाचे धक्के ग्रामस्थांत भय : घरांवरील पत्रे हादरले, भांडी पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 11:45 PM2017-12-03T23:45:20+5:302017-12-03T23:52:12+5:30
कळवण : दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे भागात शनिवारी रात्री व रविवारी (दि. ३) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधवांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंत्रणा नसल्याने भूकंप नेमका किती रिश्टर स्केलचा बसला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
कळवण : दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे भागात शनिवारी रात्री व रविवारी (दि. ३) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधवांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंत्रणा नसल्याने भूकंप नेमका किती रिश्टर स्केलचा बसला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
भूकंपाच्या या धक्यामुळे अनेक आदिवासी बांधवांच्या घरातील भांडे पडली, घरांवरील पत्रे हादरली. दळवट हे भूकंपाचे केंद्रबिंदू असून याठिकाणी भूकंप मापक यंत्र अथवा धोक्याची सूचना देणारा सायरन नसल्याचे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. याबाबत मेरी कार्यालयाशी संपर्क साधला असता सकाळी ११ वाजेपर्यंत भूकंप मापक यंत्रावर कोणत्याची प्रकारची नोंद नसल्याचे कार्यालयातील चारु लता चौधरी यांनी सांगितले. तहसीलदार कैलास चावडे यांनी सौम्य धक्के बसल्याचे मान्य करत कुठेही मालमत्तेची अथवा जीवीत हानी झाली नसल्याचे सांगितले. तर महसूल आणि पोलीस यंत्रणेने दळवट परिसरात भेटी देऊन आदीवासी बांधवांशी चर्चा करु न त्यांना दिलासा दिला.
दळवटचे सरपंच रमेश पवार, लक्क्षण पवार , यशवंत पवार यांनी भूकंपाच्या ह्या धक्क्यामुळे आदिवासी बांधव भयभयीत झाले असल्याचे सांगितले. दळवट परिसर १९९५ पासून भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने या भागाकडे शासनाने लक्ष केंद्रित करून विविध सुविधा पुरवाव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ै जयश्री पवार यांनी केली आहे.
यंत्रणा कार्यान्वित करा
च्दळवट परिसरात नेहमी असे धक्के बसत असतात. भूकंपमापन यंत्रच नसल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. शासनाने दळवट व परिसरातील भूकंपप्रवण क्षेत्रात भूकंप मापन यंत्र बसवावे. त्यामुळे भूकंप धक्का किती रिश्टरचा होता व त्याची तीव्रता तसेच पुर्वसुचना लक्षात येईल, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केली आहे.आता तरी लक्ष द्या
च्सप्टेंबर २०१३ मध्ये बोरदैवत, देवळीवणी, चिंचपाडा, खिराड, अंबिका, ओझर आदी परिसरात सलग ४ ते ५ दिवस भूकंपाचे धक्के बसले होते. या भागात भ्रमणध्वनीची सेवा सुरळीत मिळत नाही. त्यामुळे येथून कुठेही संपर्क होत नाही. अशा परिस्थितीत अघटित घडले तर आम्ही काय करायचे, असा सवाल या भागातील आदिवासी बांधवांनी केला आहे.