दळवट परिसरात भूकंपाचे धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 06:21 PM2019-01-30T18:21:09+5:302019-01-30T18:21:29+5:30

ग्रामस्थांमध्ये घबराट : ऐन थंडीत रात्र घराबाहेर

 Earthquake tremors in Torture area | दळवट परिसरात भूकंपाचे धक्के

दळवट परिसरात भूकंपाचे धक्के

Next
ठळक मुद्दे शासनस्तरावरु न याबाबत उपाययोजना करु न दिलासा द्यावा, अशी मागणी या भागातील आदीवासी बांधवांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या दळवटसह परिसरातील पळसदर, सुकापूर, मोहपाडा ,बिलवाडी, देवळीवणी, चिचंपाडा, बोरदैवत, जामलेवणी, देवळीकराड ,खिराड आदी भागात गेल्या रविवार(दि.२७) पासून भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभयीत झाले आहेत. त्यामुळे ऐन थंडीत आदिवासी बांधवांना घराबाहेर रात्र जागून काढावी लागत आहे.
बिलवाडी, देवळीवणी, चिचंपाडा , जामलेवणी, देवळीकराड,खिराड येथील आदीवासी बांधव गेल्या तीन दिवसांपासून रात्र घराबाहेर जागून काढत असून त्यात वाढलेल्या थंडीमुळे शेकोटीचा आसरा घ्यावा लागत आहे. रविवारपासून धक्के बसत आहेत. रविवारी रात्री परिसरात भूकंपाचे धक्के बसले मात्र रात्रअसल्याने फारसे लक्षात आले नाही. सकाळी मात्र पुन्हा धक्के बसल्याचे जाणवले. त्यावेळी वीजतारा झोक्यासारख्या हलत होत्या. वीजेचे खांबही हलत होते, काही घरातील भांडे पडली तर पत्र्यांच्या घरांना हादरे बसले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पंचायत समिती सदस्य जगन साबळे, सरपंच लक्ष्मण गायकवाड, पोपट महाले , हिरामण साबळे, देवीदास साबळे, यादव चव्हाण, धनराज चव्हाण, मनोहर बागूल , सोमनाथ गायकवाड, लहानू साबळे , रंगनाथ भोये , कृष्णा पवार, दौलत पवार ,देवळीवणीचे सरपंच कृष्णा चव्हाण , युवराज चव्हाण यांनी सांगितले.मात्र, या धक्क्याने कुठलेही नुकसान झाले नसल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले,
दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ जयश्री पवार , जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, बाजार समिती संचालक डी.एम. गायकवाड, अभोणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ सोनवणे यांनी भूकंपाचे धक्के बसलेल्या गावांना भेटी देऊन अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी भयभीत झालेल्या आदिवासी बांधवांना दिलासा दिला. शासनस्तरावरु न याबाबत उपाययोजना करु न दिलासा द्यावा, अशी मागणी या भागातील आदीवासी बांधवांनी केली आहे.
आता तरी लक्ष द्या
बिलवाडी, बोरदैवत, देवळीवणी ,चिंचपाडा, खिराड आदी परिसरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. आदिवासी बांधवांना या भागात बीएसएनएल व अन्य कंपनीची सेवा सुरळीत मिळत नाही. त्यामुळे येथून कुठेही संपर्क करता येत नाही. काही माहिती द्यायची असेल तर बाहेर जावून भ्रमणध्वनी करावा लागतो. अशा परिस्थितीत काही अघटीत घडले तर आम्ही करायचे काय, असा संतप्त सवाल आदिवासी बांधवांनी केला आहे .

Web Title:  Earthquake tremors in Torture area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.