नाशिकच्या पूर्व भागात ऊसतोड कामगार दाखल

By admin | Published: November 8, 2016 01:41 AM2016-11-08T01:41:06+5:302016-11-08T01:37:24+5:30

नाशिकच्या पूर्व भागात ऊसतोड कामगार दाखल

In the east of Nashik, the oasodond workers were lodged | नाशिकच्या पूर्व भागात ऊसतोड कामगार दाखल

नाशिकच्या पूर्व भागात ऊसतोड कामगार दाखल

Next

चाडेगाव : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात राज्यांच्या विविध भागांतून ऊसतोड कामगार बैलगाडी व संसार घेऊन सहकुटुंब दाखल होत आहे. नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदे, पळसे, चेहडी, सामनगाव, कोटमगाव, एकलहरे, नाणेगाव, हिंगणवेढे, चाडेगाव आदि आजूबाजूच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसलागवड केली जाते. गेल्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्याने उसाचे पीक कमी प्रमाणात आलेले आहे. त्यामुळे साखर कारखान्याकडून ऊस तोडण्यासाठी घाई केली जात असून, जास्तीत-जास्त ऊस मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र शासनाकडून उसाचा दर जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांनी ऊस तोडण्यास अद्यापपर्यंत हिरवा कंदील दिलेला नाही. संगमनेर सहकारी साखर कारखाना, संजीवनी साखर कारखाना केजिदास साखर कारखाना, प्रवरा साखर कारखाना, कोळपेवाडी साखर कारखान्याचे ऊसतोडणी कामगार सहकुटुंब संसार व बैलगाड्या घेऊन तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये दाखल झाले आहे. परिसरात ऊसतोडणी लवकर सुरू न झाल्यास ऊसतोडणी कामगारांच्या बैलांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. यंदाच्या हंगामात उसासाठी किमान ३५०० प्रती टन असा पहिला हप्ता शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी आशा शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)





 

Web Title: In the east of Nashik, the oasodond workers were lodged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.