सिन्नरला रब्बी हंगामातील पिकांना मोठी पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 10:52 PM2019-12-08T22:52:14+5:302019-12-08T22:54:27+5:30

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यावर्षी ज्वारी, हरभऱ्याऐवजी शेतकऱ्यांनी मका, गहू, कांदा या पिकांना पसंती दिली असून, यामुळे लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

East part: increased cultivation | सिन्नरला रब्बी हंगामातील पिकांना मोठी पसंती

सिन्नरला रब्बी हंगामातील पिकांना मोठी पसंती

googlenewsNext
ठळक मुद्देपूर्व भाग : लागवडीत झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यावर्षी ज्वारी, हरभऱ्याऐवजी शेतकऱ्यांनी मका, गहू, कांदा या पिकांना पसंती दिली असून, यामुळे लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.
अतिपावसाने खरिपाचे पीक पाण्याखाली गेल्याने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा विहिरींना पाणी मुबलक असल्याने झालेले नुकसान रब्बीच्या उत्पादनातून भरून निघेल अशी अपेक्षा ठेवून गहू, मका, कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील देवपूर, खोपडी, दातली, निमगाव, वडांगळी, कीर्तांगळी, शिंदेवाडी, उजनी, भरतपूर, मिठसागरे, पुतळेवाडी, पंचाळे, पाथरे, वावी आदी ठिकाणी वरील पिकांना पसंती दिली आहे.
पूर्व भागात दहा वर्षांनंतर जाम व देव नदी दुथडी भरून वाहिली असून, नदीपात्रात असलेले बंधारे तुडुंब असल्याने यंदा रब्बी हंगाम जोमात होईल, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे. प्रत्येक शेतकºयाच्या शेतातील विहिरीला मुबलक पाणी आहे. शेतकामांना सुरुवात झाल्याने मजूरटंचाई जाणवत आहे. यामुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणीला पसंती दिली जात आहे. परतीच्या पावसाने कांदा रोपे सडल्याने कांदा
बियाणांची पेरणी प्रथमच या भागात पहावयास मिळत आहे. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी मका क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असली तरी लष्करी अळीचे संकट रब्बीतही कायम आहे. पेरणी खोळंबली
काही ठिकाणी शेतात साचलेले पावसाचे पाणी तसेच असल्याने रब्बी पेरणी खोळंबली असून, दहा ते बारा दिवसांत वाफसा झाल्यानंतर उर्वरित पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज आहे.

Web Title: East part: increased cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.