देवळा तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळाच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 06:35 PM2018-09-08T18:35:10+5:302018-09-08T18:42:47+5:30

चणकापूर धरणाचे पाणी झाडी-एरंडगाव धरणात कधी पडेल असा संतप्त सवाल देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता करीत असून, सद्यस्थितीत या भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने कशातरी पेरण्या पूर्ण केल्या आहेत; परंतु पेरणीनंतर पाऊसच झाला नसल्याने खरीप पिकांचे नुकसान होत आहे.

The eastern part of the Deola taluka is in the shadow of drought | देवळा तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळाच्या छायेत

देवळा तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळाच्या छायेत

googlenewsNext
ठळक मुद्देपाण्यासाठी भटकंती चणकापूरचे पूरपाणी कधी मिळणार? जनतेचा सवाल

उमराणे : जिव्हाळ्याचा परंतु गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला चणकापूर झाडी एरंडगाव कालवा कधी पूर्ण होईल व चणकापूर धरणाचे पाणी झाडी-एरंडगाव धरणात कधी पडेल असा संतप्त सवाल देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता करीत असून, सद्यस्थितीत या भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने कशातरी पेरण्या पूर्ण केल्या आहेत; परंतु पेरणीनंतर पाऊसच झाला नसल्याने खरीप पिकांचे नुकसान होत आहे.
चणकापूर ते झाडी एरंडगाव उजवा कालवा गेल्या अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्याने पंचवार्षिक निवडणुकींच्या माध्यमातून हळूहळू पुढे सरकत आला आहे. खडतर प्रवासातून हळूहळू मार्गक्र मण करणाऱ्या पुनद प्रकल्पांतर्गत चणकापूर ते झाडी एरंडगाव या ३६ कि.मी.अंतराच्या कालव्याचा इतिहासात बघता जिल्ह्यातील कळवण, देवळा, मालेगाव आदी दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सर्वप्रथम या उजव्या कालव्याला मंजुरी मिळाली होती. या कालव्यांतर्गत दुष्काळी भागात दोन लघु पाटबंधारे, २३ पाझर तलाव, ११ को.पा. बंधारे त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्के भरण्यासाठी चणकापूर धरणातून पूरपाणी देणे नियोजित आहे. त्या अनुषंगाने २००८ साली या धरणातून पूरपाणी प्रवाहित करून रामेश्वर धरणापर्यंत पाणी पोहोचले होते. तेथून पुढील चारीचे काम पुढे सरकत असताना दहीवड जवळील १३ ते १५ कि.मी.अंतरात भुयारी बोगदा असल्याने व त्यातच ही जमीन वनविभागाची असल्याने त्याची रितसर परवानगी व शासकीय निधीअभावी हा कालवा बरीच वर्ष रखडून पडला होता. आजमितीस हा कालवा दहिवडपर्यंत येऊन पाहोेचला असून, तेथून पुढील १६ ते २८ कि.मी. मधील काम वेगवेगळ्या ठेकेदारांकडून केले गेले असल्याने काही ठेकेदारांनी काम पूर्ण केले तर काहींचे काम अपूर्णच आहे. कालव्याचे काम पूर्ण होऊन पाणी मिळावे यासाठी मागील वर्षी देवळा तालुका पूर्वभाग कृती समितीतर्फे देवळा येथे रास्ता रोको आंदोलन छेडून पिंपळगाव (वा.), खुंटेवाडी, वाखारी, मेशी, दहीवड, खडकतळे, खारीपाडा, डोंगरगाव, उमराणे, चिंचवे, सांगवी, कुंभार्डे, गिरणारे, झाडी, तिसगाव, वºहाळे, सावकारवाडी, एरंडगाव आदी गावातील जनतेकडून तहसील कार्यालयासमोर चक्र ी पद्धतीने साखळी उपोषण करण्यात आले होते; परंतु शासनाने याची फारशी दखल न घेता या उपोषणाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे सध्यातरी या कालवा पूर्णत्वाचे स्वप्न अंधारातच आहे.
 

Web Title: The eastern part of the Deola taluka is in the shadow of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.