जिल्हा प्रशासनाचे खरिपासाठी सुलभ पीककर्ज अभियान

By Admin | Published: May 25, 2017 01:08 AM2017-05-25T01:08:02+5:302017-05-25T01:08:19+5:30

नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुलभ पीकक र्ज अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रीयीकृत बँकांच्या ३०० हून पीककर्ज शिबिरांचे आयोजन केले

Easy Peekeepers Campaign for District Administration | जिल्हा प्रशासनाचे खरिपासाठी सुलभ पीककर्ज अभियान

जिल्हा प्रशासनाचे खरिपासाठी सुलभ पीककर्ज अभियान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुलभ पीकक र्ज अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रीयीकृत बँकांच्या ३०० हून पीककर्ज शिबिरांचे आयोजन केले असून, या माध्यमातून शेतकऱ्यांना जागेवर १ लाख रुपयांपर्यंतचे क र्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिक ारी राधाकृष्णन् बी यांनी दिली.
तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळाच्या गर्गेत सापडलेल्या शेतक ऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाल्यानंतर गेल्या वर्षभरात शेतमालाचे भाव घसरल्याने पुरता हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला यंदाचा खरीप हंगाम उभा करण्यासाठी प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. या अभियानाच्या माध्यमातून १ लाख शेतकऱ्यांना सुलभ पीककर्ज अभियानातून कर्ज उपलब्ध करून देण्याचे लक्ष असून, जिल्हाभरात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन, पीक कर्जासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रसासकीय यंत्रणा मदत करणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून १ लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या पात्र प्रस्तावांना जागेवरच मंजुरी देण्यात येणार आहे. तर एक लाखाहून अधिक रकमेच्या कर्ज मागणी प्रस्तावांना आठ दिवसांच्या आत निकाली काढून पात्र शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात येणार असून, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापक, विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव, सर्व मंडळ अधिकारी, सर्व कृषी पर्यवेक्षक आदिंना समाविष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Easy Peekeepers Campaign for District Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.