लाखो रु पयाचा रद्दी कागद जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 07:30 PM2019-07-28T19:30:23+5:302019-07-28T19:54:47+5:30
येवला : शहरातील नांदगाव रोड लगत असलेल्या मिल्लत नगर भागामध्ये भर वस्तीमधील रद्दी कागद गोडाऊनला आग लागल्याने लाखो रु पयाचा रद्दी कागद, पेपर कटिंग मशिनरी, मोटर सायकल, सायकल जळून खाक झाल्या. या आगीत सुमारे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
येवला : शहरातील नांदगाव रोड लगत असलेल्या मिल्लत नगर भागामध्ये भर वस्तीमधील रद्दी कागद गोडाऊनला आग लागल्याने लाखो रु पयाचा रद्दी कागद, पेपर कटिंग मशिनरी, मोटर सायकल, सायकल जळून खाक झाल्या. या आगीत सुमारे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जाते. घटनेची खबर मिळताच येवला नगरपालिकेच्या अिग्नशमन विभागाला मिळताच पालिका मुख्याधिकारी संगीता नांदुरकर-शहाणे यांनी त्वरीत घटनास्थळी अग्नीशमन दलाची कुमक पाठवली. सुमारे सहा ते सात तासाच्या शर्तीच्या प्रयत्नाने येवला नगरपालिका व मनमाड नगरपालिका यांच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
रहिवासी भागात सदर गोडाऊन आहे. त्यामुळे तेथील नागरीकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
शहरातील मिल्लत नगर भागात शेख शब्बीर अब्दुल गफूर घासी यांचे रद्दी कागद किटंग उद्योग आहे याठिकाणी उद्योगात वापरला जाणारा कागदाचा किस तयार केला जातो. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास रहिवाशांना मोठ्या स्फोटाचा आवाज आला. मध्यरात्री तीन वाजता कशाचा आवाज म्हणून ते बाहेर आले असता त्यांना पेटलेले दिसले. तिथे असलेल्या मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीचा आगीमुळे स्फोट झाला, त्या ठिकाणी असलेला रद्दी कागदाचा माल यामुळे आगीने रौद्र स्वरूप धारण केले. आग आटोक्यात आणण्याकरीता गोडाऊनचे पत्रे काढून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले.
अग्निशमन अधिकारी तुषार लोणारी यांचेसह कृष्णा गुंजाळ, सोपान सोनवणे, राजू लोंढे, विलास जगदाळे, नितीन कुºहे तसेच मनमाडच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.