बंडखोरीचे ग्रहण अन् मनधरणी : नगरपालिकेचा माहौल अधिकाधिक रंगतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:21 AM2017-11-28T00:21:25+5:302017-11-28T00:21:35+5:30
नगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज माघारीचा दिवस असल्याने त्याकडे उमेदवारांसह समर्थक, कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने खºया अर्थाने रंगत वाढणार आहे. भाजपा-सेनेसह प्रमुख पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले असून, बंडखोरांना शांत करण्यासाठी मनधरणी करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
इगतपुरी / त्र्यंबकेश्वर : नगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज माघारीचा दिवस असल्याने त्याकडे उमेदवारांसह समर्थक, कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने खºया अर्थाने रंगत वाढणार आहे. भाजपा-सेनेसह प्रमुख पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले असून, बंडखोरांना शांत करण्यासाठी मनधरणी करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी नगरपालिकेचा माहौल सध्या अधिकाधिक रंगतदार होताना दिसत आहे. मतदारांना वेगवेगळी प्रलोभने देत आकर्षित केल्याचा प्रयत्न केला जात आहे. आजच्या अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार असून, बंडखोर उमेदवार आणि पदाधिकारी यांच्यात पाठशिवणीचा खेळ, माघारी होत नसल्याने पक्षीय पदाधिकाºयांची धकधक वाढली आहे. कार्यकर्ते तुटले तर पक्षाची मोठी हानी होईल, असा प्रश्न प्रमुख नेत्यांना सतावत आहे. या उद्देशाने उमेदवाराला माघारीही घ्यायला लावायची व पक्षातर्फे तुटूही द्यायचे नाही यासाठी विविध पक्षांचे वरिष्ठ पातळीवरून जिल्हा नेत्यांकडून दबाव आणायला सुरुवात झाली आहे. व्यक्तीपेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे. आपल्याला पक्षाचा झेंडा नपावर फडकवायचा आहे. तू आता माघारी घे पुढच्या वेळेस तुझा विचार करू. आम्ही तुला वचन देतो. पुढच्या वेळेस तुझी उमेदवारी हमखास राहील, असे आश्वासन देत मनधरणी जिल्हा नेत्यांनासुद्धा करावी लागत आहे. नगरपालिका निवडणुकीची रंगत अंतिम टप्प्यात आली आहे. माघारीसाठी अवघे काही तास बाकी असून, उमेदवारांची धावपळ सुरू असल्याचे दिसत आहे.
उमेदवारांचे मोबाइल ‘नॉट रिचेबल’
इगतपुरी शहरातील विविध प्रभागात अनेक बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी बरेच उमेदवार परगावी निघून गेले आहेत. त्यांचा मोबाइल ‘नॉट रिचेबल’ येत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी याला गाठायचे कसे हा प्रश्न निवडून येणाºया उमेदवारांना पडला आहे. अनेक ठिकाणी शोधाशोध करूनही बंडखोर उमेदवार भेटत नसल्याने पक्षीय उमेदवार हतबल झाले आहेत.
उमेदवारीची आस अन् भेटवस्तूंचे वाटप खास...
पक्षाने उमेदवारी न दिल्याने अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. गेल्या वर्षभरात उमेदवारी मिळेल या इच्छेने व मी निवडून येणार या आत्मविश्वासाने उमेदवारांनी विविध सामाजिक उपक्रम, क्रीडा स्पर्धांना तसेच विविध मंडळांना टी-शर्ट वाटप, क्रीडा साहित्य वाटप करून खर्च केला आहे. उमेदवारी मिळवायची तर चार कार्यकर्ते पाहिजे; पण आता पहिला जमाना राहिला नसून रिकामा कोणीही कार्यकर्ता सोबत फिरायला नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
खर्चाची यादी अन् उमेदवारांची शक्कल...
अनेक पक्षांकडून बंडखोर उमेदवाराची मनधरणीसाठी वेगवेगळी शक्कल लढविल्या जात आहेत. यात बंडखोर उमेदवाराचे नातेगोते शोधून त्याला मनविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक बंडखोर उमेदवारांना अनेक नातेवाइकांमार्फत प्रयत्न केले आहेत; मात्र काहींना थारा मिळत आहे तर काही उमेदवार माघारी घेण्याच्या मन:स्थितीत नाही. शहरात अनेक निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने अनेक उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. मात्र या उमेदवारांची समजूत कशी काढायची हा पक्षातील प्रमुखांना प्रश्न पडला आहे तर आता उमेदवारी मागे कशी घ्यायची? आमचा एवढा पैैसा खर्च झाला आहे. तुम्ही सर्व खर्च द्यायला तयार असाल तर मी माघार घेतो. काही उमेदवार जर त्यांच्याकडे माघारीसाठी आले तर तो उमेदवार आतापर्यंत माझा एवढा खर्च कसा झाला याची यादी त्यांना दाखवत आहे.
मते खाण्यासाठी बंडखोरी...
नगरपालिका निवडणूक म्हटली की, एक एकमत महत्त्वाचे असते. मात्र काही पक्षीय उमेदवारांनी समोरच्या पक्षातील उमेदवाराची मते खाण्यासाठी त्याच पक्षातील उमेदवाराच्या जवळच्या मित्राला किंवा नातेवाइकांना बंडखोरी उमेदवारी अर्ज भरायला लावला असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तुझ्याजवळचे मत मला नाही मिळाले तरी चालेल मात्र ते बंडखोर उमेदवाराला पाडून मते खाल्ली गेली पाहिजे. बंडखोर उमेदवारांसाठी आर्थिक रसद विरोधी गोटातील उमेदवार किती मते खाणार यावर सत्ताधारी गटातील प्रमुखांनी बंडखोरांना आर्थिक रसद पुरवली असल्याची चर्चा आहे.