कोठारी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळी
By admin | Published: October 28, 2016 01:02 AM2016-10-28T01:02:47+5:302016-10-28T01:30:13+5:30
कोठारी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळी
नाशिकरोड : जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींच्या प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यात आली.
मुख्याध्यापक राजश्री खोडके यांच्या हस्ते सरस्वती व लक्ष्मीचे पूजन करण्यात आले. खोडके यांनी मुलींना फटाक्यांसाठी कमी खर्च करून ध्वनिप्रदूषण टाळावे व सुटीत दररोज एक पुस्तक वाचावे, असा संदेश दिला. यावेळी ‘आमचं नाशिक स्मार्ट नाशिक, घर ठेवा साफ मग दवाखाना माफ, फटाक्यांचा खर्च टाळा बचत पैशांची करा, टिकल्या सुरसुऱ्या वाजवा, ध्वनिप्रदूषणाला घाला आळा’ आदि प्रकारचे घोषवाक्य तयार करून विद्यार्थिनींनी शाळेच्या आवारातून फेरी काढली होती. यावेळी आकाशकंदील भेटकार्ट बनवणे, पणत्या सजवणे हा उपक्रमदेखील घेण्यात आला. शाळेत स्वच्छता करून रांगोळी काढून पणत्यांची आरास करण्यात आली होती. कल्याणी कुऱ्हे यांनी दिवाळीची माहिती सांगितली. यावेळी सुनीता सोनगिरे, सुरेखा पाटील, रेखा पगार, छाया जाधव, जयश्री भडके, सुषमा यादव, शोभा गरुड, रेवती बुरकुले, अरुण काळे आदि उपस्थित होते.