मराठा हायस्कूलची पर्यावरणपूरक दिवाळी
By Admin | Published: October 29, 2016 11:55 PM2016-10-29T23:55:55+5:302016-10-29T23:56:34+5:30
मराठा हायस्कूलची पर्यावरणपूरक दिवाळी
नाशिक : मविप्र समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये फटाकेविरहित दीपावली साजरी करण्याचा निश्चय करण्यात आला. मुख्याध्यापक अरु ण पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्र मात विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाला फटाके न फोडण्याचा संकल्प केला.
फटाक्यांमुळे वातावरणात वायू व ध्वनीचे प्रदूषण होत असल्याचे अरु ण पिंगळे यांनी सांगितले. श्वसनाचे वेगवेगळे विकार व आजारांविषयीही त्यांनी यावेळी माहिती दिली. याप्रसंगी चित्रकला शिक्षकांनी ‘आकाशकंदील’ तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. चित्रकला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आकाशकंदील बनवून दाखविला आणि विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक मार्गदर्शन करून आकाशकंदील बनवून घेतले. उपमुख्याध्यापक बी. आर. कहांडळ, पर्यवेक्षक अरु ण पवार व कारभारी गावले व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.