पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार : पंचवटी अमरधाममध्ये दोन मृतदेहांचा यशस्वी अंत्यविधी पहिल्याच प्रयोगातून वाचविले साडेसहाशे किलो लाकूड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 01:24 AM2018-02-05T01:24:08+5:302018-02-05T01:24:53+5:30
नाशिक : अंत्येष्टीच्या पारंपरिक दहन पद्धतीलाच अनुसरून शेतकचºयापासून तयार केलेल्या मोक्षकाष्ठ (ब्रिकेट्स) द्वारे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रभावी यशस्वी पर्याय पुढे आला
नाशिक : अंत्येष्टीच्या पारंपरिक दहन पद्धतीलाच अनुसरून शेतकचºयापासून तयार केलेल्या मोक्षकाष्ठ (ब्रिकेट्स) द्वारे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रभावी यशस्वी पर्याय पुढे आला. या धर्तीवर इको फ्रेण्डली लिव्हिंग फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील पंचवटी अमरधाममध्ये पहिला पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रयोग राबविला गेला. या प्रयोगाद्वारे एकूण साडेसहाशे किलो जळाऊ लाकूड वाचविण्यास मदत झाली, हे पर्यावरणाच्या दृष्टीने शुभ वर्तमान मानले जात आहे. भारतात दरवर्षी अंदाजे एक कोटी लोक मृत्युमुखी पडतात व त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणाºया लाकडांच्या माध्यमातून जवळपास पंधरा वर्षे वयाची दोन कोटी झाडे कापली जातात. एकूणच पर्यावरणाची यामुळे मोठी हानी होते. या पारंपरिक अंत्यसंस्काराच्या पद्धतीला अस्तित्वात ठेवून मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे मात्र त्यासाठी लाकू डऐवजी मोक्षकाष्ठ वापरण्याची संकल्पना नौदलातून सेवानिवृत्त झालेले नागपूरचे विजय लिमये यांनी २०१५ साली पुढे आणली. नागपूर, यवतमाळ, भांडूप या शहरांमध्ये मोक्षकाष्ठद्वारे अंत्यसंस्काराची पद्धत स्वीकारली गेली आहे. या पद्धतीमुळे त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा होणारा उपयोग थांबला आहे. नाशिकमध्येदेखील अंत्यसंस्काराची पद्धत जुनीच मात्र त्यासाठी लागणारे इंधन नवे यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. शनिवारी (दि.३) पंचवटी अमरधाममध्ये दोघा कु टुंबीयांनी या पद्धतीचा स्वीकार करत त्यांच्या नातेवाइकांच्या मृतदेहावर मोक्षकाष्ठद्वारे अंत्यसंस्कार केले. यावेळी इको फ्रे ण्डली फाउंडेशनचे लिमये, योगेश शास्त्री, मिलिंद पगारे, जितेंद्र भाबे आदींनी उपस्थित राहून हा प्रयोग कितपत यशस्वी झाला हे पडताळून बघितले.
एका मृतदेहासाठी २५० किलो मोक्षकाष्ठ
एका मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी सरकारी नियमानुसार साडेतीनशे किलो लाकूड दिले जाते. यासाठी अंत्यसंस्काराला सुमारे दोन हजार रुपयांचा खर्च येतो व तितकाच खर्च पर्यावरणपूरक मोक्षकाष्ठ वापरून अंत्यसंस्कारासाठीही येतो; मात्र लाकूड वाचते पर्यायाने वृक्षतोडीलाही आळा बसण्यास मदत होते. अमरधाममध्ये पहिल्या प्रयोगात एका मृतदेहावर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी २५० किलो मोक्षकाष्ठ लागले. या प्रयोगातून सुमारे पन्नास वर्षे जुनी दोनी मोठी झाडे वाचल्याचे लिमये म्हणाले. अंत्यसंस्काराची पद्धत जुनीच मात्र इंधन नवे हा बदल स्वीकारला तर भावी पिढीला नक्कीच हरित वसुंधरा सोपविता येईल, असा विश्वास लिमये यांनी व्यक्त केला.