पर्यावरणपूरक गणेश विर्सजन : तीस नैसर्गिक जलाशय, तर ४६ कृत्रिम तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:04 AM2018-09-23T01:04:25+5:302018-09-23T01:04:42+5:30

शहरात पर्यावरणपूरक गणेश विर्सजन व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने यंदाही प्रतिवर्षांप्रमाणे गोदावरी, नासर्डी आणि वालदेवी नदीच्या परिसरात एकूण ३० ठिकाणी अधिकृत विसर्जन स्थळे घोषित करण्यात आली

 Eco-friendly Ganesh Virusan: thirty natural reservoirs, 46 artificial ponds | पर्यावरणपूरक गणेश विर्सजन : तीस नैसर्गिक जलाशय, तर ४६ कृत्रिम तलाव

पर्यावरणपूरक गणेश विर्सजन : तीस नैसर्गिक जलाशय, तर ४६ कृत्रिम तलाव

Next

नाशिक : शहरात पर्यावरणपूरक गणेश विर्सजन व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने यंदाही प्रतिवर्षांप्रमाणे गोदावरी, नासर्डी आणि वालदेवी नदीच्या परिसरात एकूण ३० ठिकाणी अधिकृत विसर्जन स्थळे घोषित करण्यात आली असून, ३६ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. शिवाय घरगुती विसर्जन करणाऱ्यांसाठी विशेषत: प्लॅस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तींसाठी मोफत अमोनियम बायकार्बोनेट उपलब्ध करून देण्यात आले आहे.  महापालिकेच्या अधिकºयांनी यासंदर्भात विविध ठिकाणी भेटी देऊन तयारीचा आढवा घेतला. महापालिकेच्या वतीने मुख्य जलाशय आणि कृत्रिम कुंड येथेही सेवाभावी संस्थांच्या वतीने मूर्ती संकलनाची व्यवस्था केली आहे.  अधिकृत घोषित करण्यात आलेल्या विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षितेसाठी सुरक्षा कर्मचारी आणि जीवरक्षक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकृत ठिकाणीच विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
विसर्जनासाठी अधिकृत जलाशय
पंचवटी - राजमाता मंगल कार्यालय, सीता सरोवर म्हसरूळ, नांदूर, मानूर गोदाघाट, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा, रामवाडी जॉगिंग ट्रॅक.
नाशिक पूर्व - लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ परिसर, नंदिनी गोदावरी संगम.
सातपूर - आनंदवल्ली गाव घाट, सोमेश्वर मंदिर घाट, गंगापूर धबधबा, अंबड लिंकरोडवरील नंदिनीनदी पूल, मते नर्सरी पुल, आयटीआय पूल औदुंबरनगर.
नाशिकरोड - चेहडी गाव दारणा नदीपात्र, पंचक गोदावरी घाट, दसक घाट, वालदेवी नदी देवळालीगाव, वडनेर पंपींग नदी किनारी, विहिीागाव वालदेवी नदी किनारी.
नाशिक पश्चिम - य. मु. पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमानघाट, अशोकस्तंभ.
कृत्रिम तलावांची विभागनिहाय व्यवस्था
पंचवटी - राजमाता मंगल कार्यालय, गोरक्षनगर कृत्रिम, आरटीओ, सीतासरोवर म्हसरूळ, नांदूरमानूर, कोणार्कनगर, तपोवन, गौरी पटांगण, नरोत्तम भवन पंचवटी कारंजा, रामवाडी जॉगिंग ट्रॅक.
नाशिक पूर्व - लक्ष्मी नारायण घाट, रामदास स्वामी मठ परिसर, नंदिनी गोदावरी संगम परिसर, साईनाथनगर चौक, रामदास स्वामीनगर टाकळीरोड, शिवाजीवाडीपूल नंदिनीनदीजवळ, किशोरनगर शारदा शाळेजवळ, राणेनगर, कलानगर चौक, राजसारथी सोसायटी.
सातपूर - आनंदवली गाव घाट परिसर, सोमेश्वर मंदिर परिसर, गंगापूर धबधबापरिसर, अंबडलिंकरोडवरील नंदिनी पूल परिसर, मते नर्सरीपूल परिसर, आयटीआय पूल औदुंबरनगर, शिवाजीनगर धर्माजी कॉलनी, रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ पाइपलाइनजवळ, अशोकनगर पोलीस चौकी.
नाशिकरोड - मुक्तिधाममागे मनपा शाळा क्र मांक १२५ मैदान, शिखरेवाडी मैदान, मनपा नर्सरी जयभवानी रोड, मनपा मैदान चेहडी पंपिंग श्रमिकनगर ट्रक टर्मिनस, नारायण बापू चौक जेलरोड.
नाशिक पश्चिम - चोपडा लॉन्स पूल परिसर, चव्हाण कॉलनी परीची बाग पंपिंग स्टेशन परिसर, फॉरेस्ट नर्सरी पूल, बॅडमिंटन हॉल येवलेकर मळा, दोंदे ब्रिज नंदिनी नदी पूल, महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, लायन्स क्लब ग्राउंड जुनी पंडित कॉलनी, शितला देवी मंदिर, टाळकुटेश्वर मंदिराजवळ.
सिडको - राजे संभाजी स्टेडिअम, अश्विननगर, डे केअर सेंटर, इंदिरानगर, जिजाऊ वाचनालय, गोविंदनगर, पवननगर, पाण्याची टाकी, कामटवाडा शाळा, वालदेवी नदीघाट कृत्रिम, पिंपळगाव खांब.

Web Title:  Eco-friendly Ganesh Virusan: thirty natural reservoirs, 46 artificial ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.