आयडियाची पर्यावरणपूरक कल्पना

By admin | Published: May 24, 2016 10:16 PM2016-05-24T22:16:36+5:302016-05-24T23:46:34+5:30

वाडा इमारत : सांस्कृतिक ओळखीचे जतन

Eco-friendly Idea of ​​Idea | आयडियाची पर्यावरणपूरक कल्पना

आयडियाची पर्यावरणपूरक कल्पना

Next

नाशिक : येथील इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन इन्व्हायर्मेंट अ‍ॅण्ड आर्किटेक्चर (आयडिया) महाविद्यालयाने इमारतीचे बांधकाम करताना इको फ्रेन्डली कल्पना वापरून नाशिकच्या वाडा संस्कृतीसोबत नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याचा प्रयत्न केला असल्याने येथील शैक्षणिक वैभवात भर पडणार असल्याचा विश्वास महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. विवेक पाटणकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आयडिया महाविद्यालयाची इमारत नाशिकच्या संस्कृतीची ओळख सांगणाऱ्या वाडा संकल्पनेवर आधारित आहे. इमारतीच्या समोरासमोर असलेल्या खिडक्या, दरवाजे आणि तावदाने यामुळे दिवसभर असणारा सूर्यप्रकाश व खेळती हवा यामुळे विजेची बचत होण्यास मदत होणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा विचार करून महाविद्यालयात वॉटर हार्व्हेस्टिंगचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. येणाऱ्या काळाची गरज ओळखून इमारतीच्या सर्व स्त्रोतांमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या मदतीने भूजलपातळी वाढविण्याचा प्रयत्न महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
इमारतीमध्ये ३० किलो वॅट वीजनिर्मिती करणारी सोलर यंत्रणा बसविण्यात आली असून, महाविद्यालयाची गरज याच सौरऊर्जेवर भागवली जाणार आहे. उर्वरित वीज महाविद्यालयाच्या परिसरातील ग्रामस्थांना पुरविण्याचा प्रशासनाचा विचार असल्याची माहिती पाटणकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Eco-friendly Idea of ​​Idea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.