पाच बंदिजनांनी बनविल्या गणरायाच्या पर्यावरणपूरक मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:19 AM2017-07-22T00:19:31+5:302017-07-22T00:19:47+5:30

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैदी सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाच कैद्यांनी सुमारे १५० गणपतीच्या पर्यावरणपूरक सुबक मूर्ती बनविल्या असून,रंगरंगोटीचा अखेरचा हात फिरविण्यात येत आहे.

The eco-friendly idol of Ganaraya made by five captives | पाच बंदिजनांनी बनविल्या गणरायाच्या पर्यावरणपूरक मूर्ती

पाच बंदिजनांनी बनविल्या गणरायाच्या पर्यावरणपूरक मूर्ती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैदी सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाच कैद्यांनी सुमारे १५० गणपतीच्या पर्यावरणपूरक सुबक मूर्ती बनविल्या असून, त्यांच्यावर रंगरंगोटीचा अखेरचा हात फिरविण्यात येत आहे.  नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात पनवेल जवळील पेण भागातील सागर भरत पवार हा एका गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. कळत-नकळत, चुकून रागाच्या भरात घडलेल्या घटनेमुळे कारागृहाच्या चार भिंतीत शिक्षा भोगावी लागते. त्यामध्ये अनेक जणांमध्ये विविध प्रकारचे कारागीर, कलाकार, साहित्यिक, लेखक असे गुण दडलेले आहेत. कैदी सागर पवार पेण भागातील असून मूर्तिकार आहे. त्याने कारागृह प्रशासनाकडे गणेशोत्सवानिमित्त गणपतीच्या मूर्ती बनविण्याची इच्छा प्रदर्शित केली.  कारागृह अधीक्षक राजकुमार साळी व इतर अधिकाऱ्यांनी कैदी सागर याला गणरायाच्या मूर्ती बनविण्यासाठी विविध प्रकारचा कच्चा माल उपलब्ध करून दिला. सागर याने कैदी चंद्रकांत सागवेकर, सखाराम बोले, विलास दिवे, अशोक भरत, गणेश सोनवणे या कैद्यांना गणपती मूर्ती बनविण्याबाबत मार्गदर्शन करत त्यांच्या मदतीने गणरायाच्या मूर्ती साकारण्यास सुरुवात केली. कारागृहातील साने गुरुजी कक्षात गेल्या दोन महिन्यांपासून कैदी सागर व त्यांचे इतर सहकारी अत्यंत भक्तिभावाने गणरायाच्या छोट्या-मोठ्या मूर्तींना आकार देत होते. जवळपास १५० पर्यावरणपूरक शाडू मातीतील छोट्या-मोठ्या सुबक मूर्ती तयार झाल्या असून त्यांना रंगरंगोटी व सजविण्याचे अखेरच्या टप्प्यातील काम सुरू आहे.



 

Web Title: The eco-friendly idol of Ganaraya made by five captives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.