साकुरला पर्यावरणपूरक आकाशकंदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:33 PM2019-10-14T18:33:48+5:302019-10-14T18:34:13+5:30
दिवाळी सण आला की, बच्चे कंपनीला वेध लागतात सुट्ट्या आणि रंग बेरंगी आकाशकंदिलाचे. विद्यार्थ्यांना शाळेतच आकाशकंदिल बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील नुतन माध्यमिक विद्यालयामध्ये एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
नांदूरवैद्य : दिवाळी सण आला की, बच्चे कंपनीला वेध लागतात सुट्ट्या आणि रंग बेरंगी आकाशकंदिलाचे. विद्यार्थ्यांना शाळेतच आकाशकंदिल बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील नुतन माध्यमिक विद्यालयामध्ये एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मुख्याध्यापक प्रविण रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो पर्यावरणपूरक आकाशकंदिल साकारले. आपल्या घरासमोरील आकाशकंदिल स्वत: बनवून लावले तर चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांचा आनंद द्विगुणित होईल.या भावनेने साकुर येथील नुतन माध्यमिक विद्यालयात पर्यावरणपूरक आकाशकंदिल बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. दिपावलीला आवश्यक असणार्या आकाशकंदिलाचे महत्व जाणून घेत त्याची पर्यावरणाशी सांगड घालण्याचा प्रयत्न या उपक्र मांद्वारे केला जात असल्याचे देवळाली नुतन माध्यमिक शाळेचे कलाशिक्षक संदिप गायकवाड यांनी सांगितले. फाईल बोर्ड, पेपर, फ्लोरसन पेपर, कापडी रिबन, डिंक यासह दो-याचा वापर करीत विद्यार्थ्यांनी शेकडो पर्यावरणपूरक आकाशकंदिल साकारले.