चिंध्यांपासून इको फ्रेंडली आकाश कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 05:09 PM2018-10-30T17:09:13+5:302018-10-30T17:29:23+5:30

निफाड : दिवाळी म्हटली की आकाश कंदिलाच्या प्रकाशाने अवघ घर उजळुन निघते व मांगल्याचे वातावरण तयार होते. पूर्वापार पद्धतीने नागरिक प्लास्टिक तसेच चायना कंपनीचे आकाश कंदील वापरण्याकडे कल असतो परंतु पर्यावरणाचा विचार करता येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत कापडाच्या चिंध्यांपासून इको फ्रेंडली आकाश कंदील तयार करून पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला.

Eco-friendly sky lanterns | चिंध्यांपासून इको फ्रेंडली आकाश कंदील

 चिंध्यांचा वापर करून तयार केलेले इको फ्रेंडली आकाश कंदील समवेत वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थी व शिक्षक गोरख सानप.

Next
ठळक मुद्देवैनतेय प्राथमिक विद्या मंदिर येथे अभिनव उपक्रम

निफाड : दिवाळी म्हटली की आकाश कंदिलाच्या प्रकाशाने अवघ घर उजळुन निघते व मांगल्याचे वातावरण तयार होते. पूर्वापार पद्धतीने नागरिक प्लास्टिक तसेच चायना कंपनीचे आकाश कंदील वापरण्याकडे कल असतो परंतु पर्यावरणाचा विचार करता येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत कापडाच्या चिंध्यांपासून इको फ्रेंडली आकाश कंदील तयार करून पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला.
निफाड शहर व परिसरातील शिंप्यांकडून वाया गेलेले कापड (चिंध्या) शिक्षक गोरख सानप यांनी गोळा केल्या या रंगीबेरंगी चिंध्याचा वापर करून आकर्षक आकाश कंदील तयार करण्याचे प्रात्यिक्षक विद्यार्थ्यांना करून दाखिवले. विविध आकाराचे आकाश कंदील तयार करताना कापडाचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या प्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फटाके मुक्त दिवाळीची शपथ दिली. दुकानातीलमहाग मिळणारे आकाश कंदील विकत घेण्याऐवजी स्वत:च्या कल्पकतेचा वापर करून टाकाऊतून टिकाऊ पर्यावरण पूरक तयार केलेला आकाश कंदील दिवाळी सणाचा आनंद नक्कीच द्विगुणीत करणारा आहे. निफाड येथील काही टेलर्सनी शाळेला चिंध्या मोफत उपलब्ध करून दिल्या.
पर्यावरण बचाव मोहिमेला चालना देणाऱ्या या उपक्र माचे न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, विश्वस्त अ‍ॅड. लक्ष्मण उगावकर, वि. दा. व्यवहारे, रतन पाटील, राजेंद्र राठी, किरण कापसे, दिलीप वाघावकर, राजेश सोनी, मधुकर राऊत, प्रभाकर कुयटे, निफाडच्या गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी एस. डी. थोरात, केंद्रप्रमुख व्ही. के. सानप, मुख्याध्यापक अलका जाधव व पालकांनी कौतुक केले.
 
Web Title: Eco-friendly sky lanterns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा