कांदा उत्पादकांना आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 09:20 PM2020-03-28T21:20:12+5:302020-03-29T00:22:13+5:30
मानोरी : परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळ आणि लाल कांद्याच्या लागवडीत वाढ झाली असून, अनेक ठिकाणी कांदा काढणीला सुरु वात झाली आहे. कांद्याचे दर सातत्याने कमी होत गेला, त्यात कोरोनाच्या परिणाम शेतमालावर जाणवू लागल्याने कांदा विक्रीतून कांदा उत्पादन खर्च फिटनेदेखील आवाक्याबाहेर झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, मुखेड फाटा, शिरसगाव, जऊळके, जळगाव नेऊर, देशमाने, सत्यगाव आदी परिसरात हजारो हेक्टर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात खुली केली. मात्र, कोरोना व्हायरसने देश लॉकडाउन झाल्याने कांद्याचे दर गडगडले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने कांदे शेतातच साठवून ठेवले होते. परंतु ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या धास्तीने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.
कांद्याचे लिलाव पुन्हा पूर्ववत झालेले असून, समाधानकारक भाव मिळतो की नाही याची शाश्वती नसताना दुसरीकडे बाजार समित्यांनी लिलावासाठी कांदे आणताना गोणीत आणण्याची अट घातल्याने खर्चात पुन्हा वाढ झाली आहे. कांद्याचे घसरलेले दराने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.कांद्याच्या विक्र ीतून उत्पादन खर्चदेखील फिटत नाही. कोरोनामुळे भाव वाढतील याची शक्यता कमी असून, आता यापुढे कांदा गोण्या मध्ये विक्र ीसाठी न्यायचा म्हटल्यावर खर्चात भर पडली असून शासनाने कांद्याला हमी भाव ठरवून देणे गरजेचे झाले आहे.
- कल्याण कोटकर,
कांदा उत्पादक, शिरसगाव लौकी