अर्थशास्त्र जीवनासाठी मार्गदर्शक: आशुतोष रारावीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 01:39 AM2021-04-02T01:39:56+5:302021-04-02T01:40:19+5:30

अर्थशास्त्र हा विषय मानवी जीवनामध्ये महत्त्वाचा असून, सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये त्याचे महत्त्व आणखीनच मोठे असल्याचे मत अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर यांनी व्यक्त केले. 

Economics Guide to Life: Ashutosh Raravikar | अर्थशास्त्र जीवनासाठी मार्गदर्शक: आशुतोष रारावीकर

अर्थशास्त्र जीवनासाठी मार्गदर्शक: आशुतोष रारावीकर

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय अर्थव्यवस्थेवर ऑनलाइन परिसंवाद

नाशिक : अर्थशास्त्र हा विषय मानवी जीवनामध्ये महत्त्वाचा असून, सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये त्याचे महत्त्व आणखीनच मोठे असल्याचे मत अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर यांनी व्यक्त केले. 
“भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिसंवाद - २०१६, २०२०, २०२४ आणि पुढील वाटचाल या विषयावर  शनिवारी ( दि. २७ )  आयोजित ऑनलाईन परिसवांदात डॉ  रारावीकर उदघाटक म्हणून बोलत होते.  त्यामध्ये प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॅा. वरदराज बापट, दिलीप शेनॉय , सचिन कुमार, डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे आदी सहभागी झाले होते .  
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रारावीकर यांनी अर्थशास्त्राचा आपल्या जीवनाच्या विविध अवस्थामध्ये कसा उपयोग होतो, हे समजावून सांगितले. तसेच या शास्त्रातील विविध संकल्पनाही स्पष्ट केल्या.
डॉ. बापट यांनी पाश्चिमात्य देशात साठ ते ७० टक्के अर्थव्यवस्था  मोठ्या उद्योगांवर अवलंबून असते. भारतात मात्र परिस्थिती वेगळी आहे.  असे सांगितले. जी एस टी करप्रणालीमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. संपूर्ण जग कोरोनाकडे वाटचाल करीत असताना मागील अनेक वर्षात पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था टिकून आहे. सध्या २०२१ मध्ये कोरोना संकट असले तरी सन २०२४ मध्ये नक्कीच नसेल. असे डॉ. बापट यांनी सांगितले. इन्स्टिट्यूटचे  अध्यक्ष राहुल वैद्य, प्रा. महेश कुलकर्णी, प्रा. शीतल गुजराथी  यांनी  मार्गदर्शन केले. 

Web Title: Economics Guide to Life: Ashutosh Raravikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.