खाद्य तेल पुन्हा तापले ; डाळींच्या दरातही किलोमागे ७ रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:13 AM2021-04-12T04:13:36+5:302021-04-12T04:13:36+5:30
शेंगदाणा तेल १७५ रु सर्वच खाद्यतेलांच्या किमती वाढल्या असून सोयाबीन तेल १३५ हुन १४० रुपये लिटर झाले आहे तर ...
शेंगदाणा तेल १७५ रु
सर्वच खाद्यतेलांच्या किमती वाढल्या असून सोयाबीन तेल १३५ हुन १४० रुपये लिटर झाले आहे तर सूर्यफुल, शेंगदाणा तेल १७५ रुपये लिटरपर्यंत पोहोचले आहे. त्यात डाळींचीही भर पडली आहे.
चौकट-
मेथी ३९ रु जुडी
पालेभाज्यांमध्ये मेथीला चांगला दर मिळत असून घाउक बाजारात मेथी २७ पासून ३९ रुपयांपर्यत जुडी विकली जात आहे. कोबी पाच पासून ११ रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.
चौकट -
किवी २५० रु किलो
कोरोनामुळे फळांची मागणी वाढली असून दरामध्ये तेजी आली आहे. किवी, संत्रा या फळांना अधिक मागणी असून किवी २५० रुपये तर संत्रा १३० रुपये किलोपर्यंत आहे. नाशिक बाजार समितीत हापूस आंबा २०० ते ३०० रुपये किलोचा दर घेत आहे.
कोट-
स्वयंपाक घरात आता पाण्याचीच फोडणी द्यावी लागणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. खाद्य तेलाचा आणि डाळींचा भडका उडाल्याने काय शिजवायचे आणि काय वाढायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. - योगिता गायकवाड, गृहीणी
कोट -
उन्हामुळे भाजीपाला पिकविणे सोपे राहिलेले नाही मोठ्या प्रमाणात औषधांची फवारणी करावी लागत आहे. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना भाजीपाला मातीमोल दराने विकावा लागला होता. - शिवाजी रासकर. शेतकरी
कोट-
किराणा बाजारात ग्राहकी चांगली आहे. तेल, तुपाचे भाव वाढले असून तेल अजुन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मसुर डाळीचे उत्पादन कमी असल्यामुळे या डाळीच्या दरात वाढ झाली आहे. - शेखर दशपुते , किराणा व्यापारी