कोरोनामुळे शाळा सुरू होणार नाही, दाखला घेऊन जा ; महापालिका शाळा शिक्षकाचे धक्कादायक विधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 08:44 PM2020-06-20T20:44:11+5:302020-06-20T20:50:44+5:30

महापालिकेच्या शाळेतील एका शिक्षकाने कोरोना लॉकडाऊन मुळे शाळा बंद करण्याची वेळ आली असून दाखला घेऊन जा असे पालकांना मोबाईल द्वारे सांगितल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. या शिक्षकाने शाळेविषयी चौकशी करणाऱ्या पालकांना दाखल्यांचे वाटप करण्यात येत असल्याचेही सांगितल्याने पालकांमध्ये शाळा सुरु होणार की नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. 

The education of 87 students is in danger due to the inflexible policy of the municipal school teachers | कोरोनामुळे शाळा सुरू होणार नाही, दाखला घेऊन जा ; महापालिका शाळा शिक्षकाचे धक्कादायक विधान

कोरोनामुळे शाळा सुरू होणार नाही, दाखला घेऊन जा ; महापालिका शाळा शिक्षकाचे धक्कादायक विधान

Next
ठळक मुद्दे महापालिका शिक्षकांचे आडमुठे धोरणवडाळा शाळेतील 87 विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

नाशिक : वडाळा गावातील महापालिकेच्या शाळेतील एका शिक्षकाने कोरोना लॉकडाऊन मुळे शाळा बंद करण्याची वेळ आली असून दाखला घेऊन जा असे पालकांना मोबाईल द्वारे सांगितल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. या शिक्षकाने शाळेविषयी चौकशी करणाऱ्या पालकांना दाखल्यांचे वाटप करण्यात येत असल्याचेही सांगितल्याने पालकांमध्ये शाळा सुरु होणार की नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. 
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सुमारे दीड महिना लॉकडाऊन करण्यात आले होते. तसेच शाळा व महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे सर्व शाळांना ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सांगण्यात आले आहे. वडाळा गावात शेतकरी व हातावर काम करणाऱ्यांची वस्ती म्हणून ओळखले जाते .यामध्ये सुमारे 60 टक्के  हातावर काम करणाऱ्यांची वस्ती आहे. त्यामुळे खाजगी शाळेतील शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने बहुतेक पालक त्यांच्या पाल्यांना  महापालिके शाळेतच शिक्षणासाठी पाठवतात. असे असताना वडाळा गावातील महापालिकेच्या शाळेत आठवीत 87 विद्यार्थी आहेत. त्या शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या  पालकांना मोबाईलवर कोरोना लॉक  डाऊनमुळे शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. तरी तुम्ही तुमच्या पाल्याचा दाखला घेऊन जा असे असे सांगितल्याने पालकांमध्ये  वर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. याप्रकरणी पालकांनी संताप व्यक्त केला आहे.  सुमारे दोन वर्षापासून नववीचा वर्ग सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्त  शिक्षणाधिकार्‍यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत आहे. ते त्याची दखल न घेता महापालिकेच्या वडाळा गावातील शाळेतील एका शिक्षकाचा आठवीतील विद्यार्थ्यांनी पाकीजा तिच्या आजोबांना मोबाईल वर तुम्ही तुमच्या पाल्याचा दाखला घेऊन जा  लॉकडाऊन मुळे शाळा बंद करण्याची वेळ आली आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही आमच्या पाल्यांना कोणत्या शाळेत शिकवायचा असा प्रश्न निर्माण झाला असल्याची प्रतिक्रिया पालक  जमील रंगरेज यांनी व्यक्त केली आहे. 

 

Web Title: The education of 87 students is in danger due to the inflexible policy of the municipal school teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.