शिक्षणामुळे अनिष्ट रुढींमध्ये बदल शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:43 PM2018-12-25T23:43:03+5:302018-12-26T00:21:24+5:30

समाज मोठा व समृद्ध होण्यासाठी समाजात शिक्षणाचा प्रसार आवश्यक असून, शिक्षण प्रसारातून अनिष्ट रुढी व परंपरांमध्ये बदल घडवून सामाजित परिवर्तन शक्य आहे. अशा परिवर्तनातून घटस्फोटाचे प्रमाणही कमी होईल

 Education can lead to change in indigestion | शिक्षणामुळे अनिष्ट रुढींमध्ये बदल शक्य

शिक्षणामुळे अनिष्ट रुढींमध्ये बदल शक्य

Next

नाशिक : समाज मोठा व समृद्ध होण्यासाठी समाजात शिक्षणाचा प्रसार आवश्यक असून, शिक्षण प्रसारातून अनिष्ट रुढी व परंपरांमध्ये बदल घडवून सामाजित परिवर्तन शक्य आहे. अशा परिवर्तनातून घटस्फोटाचे प्रमाणही कमी होईल, असे प्रतिपादन तज्ज्ञ डॉ. सुरेश सूर्यवंशी यांनी केले.
दादासाहेब गायकवाड सभागृहात नाशिक महानगर तेली समाजाच्या वधू-वर व पालक मेळाव्यात ते बोलत होते. डॉ. सुरेश सूर्यवंशी म्हणाले, मुलींना उच्च शिक्षणसोबत उत्तम आरोग्यासाठीही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तत्पूर्वी वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन जनार्दन बेलगावकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर वधू- वर परिचय सूचीचे प्रकाशन विक्रांत चांदवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, मनपा गटनेते गजानन शेलार, भानुदास चौधरी, महानगर अध्यक्ष प्रवीण चांदवडकर, हितेश यतीन वाघ, सेवानिवृत्त शहर अभियंता उत्तम पवार, माजी उपमहापौर सुमन बागले, अंजली आमले, उषा शेलार, माजी अध्यक्ष प्रवीण पवार, संतोष वाघचौरे, कैलास पवार, हेमंत कर्डिले, वैशाली शेलार, सुनीता सोनवणे, नितीन व्यवहारे आदी उपस्थित
होते. प्रास्तविक प्रमुख संयोजक उत्तम सोनवणे, सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले. मेळावा सुनील शिरसाठ यांनी आभार मानले.
३५६२ इच्छुक वधू-वर पुस्तिकेमध्ये एकूण ३५६२ विवाह इच्छुक  मुला-मुलींची नोंदणी झाली असून, यात १,७४१ मुले, तर १८२१ मुलींचा समावेश आहे.

Web Title:  Education can lead to change in indigestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक