दुबईवारीत शिक्षण विभागाने जाणून घेतले शिक्षणाचे नवे आयाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 05:42 PM2018-11-23T17:42:16+5:302018-11-23T17:42:31+5:30
सिन्नर : नाशिक जिल्हा शिक्षण विभागाचे अधिकारी आणि मुख्याध्यापक संघ यांच्या ४५ जणांच्या पथकाने दुबई येथील शाळांना भेटी देऊन स्कुलला भेट देवून तेथील शैक्षणिक अभ्यासक्रम, विद्यार्थी योजना यांच्यासह विविध घडामोडींचा आढावा घेतला.
सिन्नर : नाशिक जिल्हा शिक्षण विभागाचे अधिकारी आणि मुख्याध्यापक संघ यांच्या ४५ जणांच्या पथकाने दुबई येथील शाळांना भेटी देऊन स्कुलला भेट देवून तेथील शैक्षणिक अभ्यासक्रम, विद्यार्थी योजना यांच्यासह विविध घडामोडींचा आढावा घेतला.
शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी दादा मोरे, एस. बी. शिरसाठ, एस. बी. देशमुख, साहेबराव कुटे, पुरूषोत्तम रकिबे, एस. व्ही. बच्छाव, भरत गांगुर्डे, दीपक ह्याळीज, गुफरान अन्सारी, माणिक मढवई यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी व मुख्याध्यापक या अभ्यासदौऱ्यात सहभागी झाले आहेत.
शैक्षणिक अभ्यासक्रम, विद्यार्थी योजना, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी राबविलेले उपक्रम, कृती प्रायोगी शिक्षण, खेळ, विद्यार्थी समोपदेशन, पालक संघ, पालक बैठका, प्रयोग शाळा, संगणक कक्ष, संगीत व कला दालन, परीक्षा पध्दती, आभासी प्रयोग शाळा अद्यावत वाचनालय, सांस्कृतिक विकास यांचा आढावा घेतला. शिस्त, स्वच्छता, १४ विद्यार्थ्यांमागे २ शिक्षक, कृतीयुक्त शिक्षण, डिजटल स्कूल, ज्ञानरचना वाद, पालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग, दिवसातून किमान २ तास खेळले पाहिजे, शाळा तपासणी पद्धत सलग आठ दिवस शिक्षणाधिकारी या आठ ते दहा जनांचे पथक येऊन तपासणी करतात व शाळेला सुधारण्यासाठी दोनच संधी देतात तिसºया वेळी गुणवत्ता कमी वाटल्यास शाळा बंद करण्याचे आदेश दिले जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. शाळेत मोठया प्रमाणात नियम पाळले जाते. सुसंस्कृत नागरिक तयार करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे दिसून आले. या दौºयात सुनील आहेर, रवि ठाकरे, दशरथ जारस, प्रविण पाटील, अशोक मोरे, सचिन शेवाळे, उल्का कुरणे आर.बी.पवार, मोहिनी भगरे, सुनंदा ठाकरे, प्रकाश चौधरी, डी. झेड. पाटील, विलास जाधव, संदीप मोरे, एस.टी.सानप, अलका गायकवाड, बी. बी. मोकळ, शैलेंद्र मोरे सहभागी झाले आहेत.