शैक्षणिक कर्जातही मिळावी माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 12:05 AM2020-10-05T00:05:01+5:302020-10-05T00:56:15+5:30

नाशिक: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाल्याने आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. वेतन कपात तसेच अनेकांचे रोजगार गेल्याने आर्थिक विवंचतेन असलेल्या सर्वसामान्य कर्जधारकांना केंद्राने काहीप्रमाणात दिलासा दिला आहे. आता शैक्षणिक कर्ज घेतलेल्या पालकांना सूट मिळावी अशी मागणी होऊ लागली आहे.

Education loans should also be waived | शैक्षणिक कर्जातही मिळावी माफी

शैक्षणिक कर्जातही मिळावी माफी

Next
ठळक मुद्देपालकांची मागणी: काही बॅँकाकडून हप्त्यासाठी तगादा

नाशिक: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाल्याने आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. वेतन कपात तसेच अनेकांचे रोजगार गेल्याने आर्थिक विवंचतेन असलेल्या सर्वसामान्य कर्जधारकांना केंद्राने काहीप्रमाणात दिलासा दिला आहे. आता शैक्षणिक कर्ज घेतलेल्या पालकांना सूट मिळावी अशी मागणी होऊ लागली आहे.

कोरानामुळे संपुर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली असून व्यापार, उद्योगांपासून सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या मार्च महिन्यापासून नोकरी आण रोजगाराच्या ठिकाणी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून त्याचा फटका सर्वसामान्य कामगारांना बसला आहे. अनेकांच्या नोकल्या गेल्या तर बहुतेक कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्यात आले आहे. चैनीच्या वस्तूंसाठी घेतलेल्या कर्जावर सूट मिळत असतांना शैक्षणिक कर्जाला सूट का मिळू नये असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

महागडे शैक्षणिक शुल्क असल्यास पालक शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज काढतात. या कर्जाची परफेड करण्यासाठीचे निकष बाजुला सारून बॅँकांकडून वसुली केली जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. काही बॅँकांनी पैसे भरण्यासाठी पालकांशी संपर्क केला असल्याच्याही तक्रारी आहेत.

मार्च पर्यंत पालकांनी रितसर बॅँकांच्या कर्जाचा हफता भरला देखील आहे. परंतू लॉकडाऊनच्या काळात आर्थिक परीस्थिती खालावल्याने बॅँकांचे कर्ज फेडणे कठिण होऊन बसले आहे. बॅँकानी कर्जाच्या हफ्त्यासाठी तगादा लावला नसला तरी नंतरच्या काळात व्याजावर व्याज घेतल्या कर्ज फेडणे कठिण होणार असल्याची भीती पालकांनी व्यक्त केलेली आहे.

परतफेडीबाबत बॅँकांचेच नियम
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज दिले जात असले तरी त्याचे व्याज अत्यल्प आहे. अनेक पालक नियमित परतावा देखील करीत आहेत. परंंतु कोरोनाच्या संकट काळात शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीबाबतचा विचार व्हावा अशाी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आ हे.

 

Web Title: Education loans should also be waived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.