शिक्षणाधिकारी बच्छाव, महाजन निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:57 PM2020-03-16T23:57:50+5:302020-03-16T23:58:37+5:30
नाशिक : पदे नसताना शाळा, महाविद्यालयांना शिक्षकांची पदे मंजूर करणे, त्याचबरोबर या शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी आवश्यक असलेले शालार्थ आयडी देताना मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार करण्याच्या कारणावरून राज्याचे शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा विभागीय उपसंचालक नितीन बच्छाव तसेच नाशिक महापालिकेचे प्रशासनाधिकारी देवीदास महाजन या दोघांनाही सेवेतून निलंबित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

सोमवारी दुपारी या संदर्भातील आदेश प्राप्त झाले. शुक्रवार (दि. १३) रोजी राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात शिक्षक मान्यतेच्या विषयावरून पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, नितीन पवार, हिरामण खोसकर आदी सदस्यांनी शिक्षण विभागातील अनागोंदीबबत प्रश्न विचारला होता.
दरम्यान, सोमवारी या संदर्भातील आदेश प्राप्त होताच, त्यात नितीन बच्छाव यांच्यासमवेत मनपा प्रशासनाधिकारी देवीदास महाजन यांनाही निलंबित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या दोघांच्याही कामकाजाची चौकशीसाठी शासनाने सहा सदस्यीय चौकशी समिती गठीत केली असून, या दोघांवरील कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.देवीदास महाजन हे जळगावी माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना त्यांनी १९ शाळांचे प्रस्तावांना मान्यता दिली व सदरचे प्रस्ताव मान्यतेसाठी नाशिकच्या विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे पाठविले होते. असाच प्रकार नाशिकचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केल्याची सदस्यांची तक्रार होती.