एमबीएसाठी शनिवारी, रविवारी सीईटी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:41 PM2018-03-07T13:41:59+5:302018-03-07T13:41:59+5:30

मास्टर ऑफ बिझनिस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्र म प्रवाशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयश येत असल्याने अथवा प्रवेश परीक्षा देऊ न शकल्यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून विद्याथ्र्यांचे एमबीए प्रवेशाचे प्रमाण घटले होते. त्यामुळे एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता तीन प्रवेश परीक्षा देण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Education should be given to students from school life - Justice C. L. Thule | एमबीएसाठी शनिवारी, रविवारी सीईटी परीक्षा

एमबीएसाठी शनिवारी, रविवारी सीईटी परीक्षा

Next
ठळक मुद्देएमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी देण्याची संधीएमबीए अभ्यासक्र मांची नाशिकसह विभागात 49 महाविद्यालये नाशिक शहरात 25 महाविद्यालये, 1300 हून अधिक जागा

नाशिक : मास्टर ऑफ बिझनिस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयश येत असल्याने अथवा प्रवेश परीक्षा देऊ न शकल्यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून विद्याथ्र्यांचे एमबीए प्रवेशाचे प्रमाण घटले होते. त्यामुळे एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन प्रवेश परीक्षा देण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील दोन परीक्षा पार पडल्या असून आता विद्यार्थ्यांना डीटीईतर्फे घेतली जाणारी सीईटी परीक्षा 10 व 11 मार्च रोजी परीक्षा देता येणार आहे. एमबीए प्रवेश परीक्षेला प्रविष्ट होण्याची ही शेवटची संधी असणार आहे.  एमबीए प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देणो बंधनकारक आहे. एमबीएसाठी सी-मॅट, तंत्रशिक्षण विभागातर्फे डीटीई एमबीए सीईटी आणि कॅट या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. विद्याथ्र्याना यापैकी कोणतीही एक सीईटी परीक्षा दिल्यानंतर त्यानुसार प्रवेश मिळू शकणार आहे. या तीन परीक्षांचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यातील पहिली सीईटी परीक्षा येत्या 20 जानेवारीला घेण्यात आली. कॅट, सीमॅट व महाराष्ट्र डीटीई एमबीए एमएमएस सीईटी या तिन्ही परीक्षांपैकी कॅट व सीमॅट या परीक्षा झाल्या आहेत, तर डीटीईतर्फे घेण्यात येणारी सीईटी परीक्षेसाठी विद्याथ्र्यानी ऑनलाइन अर्ज केले आहे. येत्या 10 व 11 मार्च रोजी ही प्रवेश परीक्षा होईल.  शहरातील एमबीए महाविद्यालयात एमबीए प्रवेशप्रक्रि या, प्रवेशपरीक्षा याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. एमबीए अभ्यासक्र मांची नाशिकसह विभागात 49 महाविद्यालये असून, त्यात 2700 हून अधिक जागा उपलब्ध आहे. तर नाशिक शहरात 25 महाविद्यालये असून त्यात 1300 हून अधिक प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत.

Web Title: Education should be given to students from school life - Justice C. L. Thule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.